♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

एनडीए गेट जवळील 14 आदिवासी कातकरी कुटुंबांना किराणा मालाचे किट वाटप; NICE LTD कंपनीने सामाजिक जाणिवेतून राबविला उपक्रम; आदिवासींचे जीवन पाहून मदत देण्यासाठी आलेले झाले भावूक 

एनडीए गेट जवळील 14 आदिवासी कातकरी कुटुंबांना किराणा मालाचे किट वाटप; NICE LTD कंपनीने सामाजिक जाणिवेतून राबविला उपक्रम; आदिवासींचे जीवन पाहून मदत देण्यासाठी आलेले झाले भावूक 

(निलेश बोरुडे: संपादक -द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस)

पुणे: खडकवासला धरणामागे एनडीए दहा नंबर गेट परिसरात असलेल्या 14 आदिवासी कातकरी कुटुंबांना दैनंदिन गरजेच्या किराणा मालाचे किट वाटप करण्यात आले. NICE Ltd कंपनीच्या NTR-X या टीमने सामाजिक जाणिवेतून आज हा उपक्रम राबविला. यावेळी मदत देण्यासाठी आलेले सर्वजण आदिवासी कातकरी कुटुंबांची परिस्थिती पाहून भावूक झाल्याचे दिसून आले.

NICE Ltd ही कंपनी दरवर्षी अशाप्रकारे सामाजिक उपक्रम राबविते. ‘द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’चे आदिवासी कातकरी समाजासाठी सातत्याने सुरू असलेले काम सोशल मिडीयाच्या माध्यमातून पाहिल्यानंतर कंपनीने यावर्षीचा उपक्रम या कातकरी नागरिकांसाठी राबविण्याचा निर्णय घेतला. राहुल झोपे व बाबुराव गोरे यांनी ‘द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’शी संपर्क साधून त्याबाबत माहिती दिली. त्यानुसार प्राथमिक नियोजन करण्यात आले.

आज NICE LTD कंपनीचे अभिलेश अर्जुगडे, अमित गांधी, रबिंद्र हरलालका, राहुल झोपे, अनिकेत करकाळे,सागर सोनटक्के, अंकिता केशवशेट्टी,मयुरी गोरे, निखिल पवार, स्वप्निल शिंदे, इब्राहिम आत्तार, आशिष श्रीवास,कृतिका पोटबत्ती यांनी प्रत्यक्ष आदिवासी कातकरी वस्तीवर जाऊन या किटचे वाटप केले. आजच्या काळातही आदिवासी कातकरी नागरिकांची अत्यंत हलाखीची परिस्थिती पाहून कंपनीचे सर्व सदस्य भावूक झाले होते.

 

द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’चे आवाहन!

अनेकांना सामाजिक कार्य करण्याची किंवा गरजू लोकांना मदत करण्याची इच्छा असते परंतु काय करावे व कोठे करावे याची माहिती मिळत नाही. अशा नागरिकांना आवाहन आहे की खडकवासला, एनडीए गेट, गोऱ्हे बुद्रुक,डोणजे,वरदाडे व परिसरात जागोजागी आदिवासी कातकरी समाजाच्या वस्त्या आहेत. आपणास शक्य ती मदत आपण किराणा माल, कपडे, अन्नधान्य अशा स्वरुपात थेट यांच्याकडे देऊ शकता. आपण केलेल्या मदतीबद्दल द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’ योग्य दखल घेऊन आपणास प्रेरणा म्हणून बातमी प्रसिद्ध करेल. आपला वाढदिवस, मुला-मुलींचे वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस, घरातील प्रिय मृत व्यक्तीच्या आठवणीनिमित्त आपण या गरजू लोकांना अवश्य मदत करा.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

Sorry, there are no polls available at the moment.

Related Articles