♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

तरुणांच्या सतर्कतेमुळे जखमी हरणाला जीवदान; वनाधिकारी-रेस्क्यु चॅरिटेबल ट्रस्टकडून तातडीने दखल 

तरुणांच्या सतर्कतेमुळे जखमी हरणाला जीवदान; वनाधिकारी-रेस्क्यु चॅरिटेबल ट्रस्टकडून तातडीने दखल 

 

पुणे: एनडीए दहा नंबर गेट परिसरात कुत्र्यांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या हरणाला खडकवासला येथील तरुण आकाश मते व सर्पमित्र वैभव खालकर यांच्या सतर्कतेमुळे जीवदान मिळाले आहे. वनविभागाचे अधिकारी व रेस्क्यु चॅरिटेबल ट्रस्टच्या सदस्यांनी संवेदनशीलपणे दखल घेऊन तातडीने कार्यवाही केल्याने हरणाचे प्राण वाचले आहेत.

एनडीए दहा नंबर गेट जवळ संरक्षक भिंतीच्या जवळ एक हरिण गंभीर जखमी होऊन पडले होते. भटक्या कुत्र्यांनी मागील दोन्ही पायांना मोठ्या प्रमाणात चावा घेतल्याने रक्तबंबाळ झाले होते. पायाला जखमा झाल्याने त्याला पळता येत नव्हते त्यामुळे हरणाची जीव वाचविण्यासाठी धडपड सुरू होती.

खडकवासला येथील तरुण आकाश मते व सर्पमित्र वैभव खालकर यांना हे हरिण दिसल्यानंतर त्यांनी ‘द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’शी संपर्क साधला. आकाश मते यास तातडीने वनपाल सचिन सपकाळ यांच्याशी संपर्क साधण्यास सांगितले. आकाश मते याने माहिती दिल्यानंतर वनपाल सचिन सपकाळ यांनी रेस्क्यु टिमला याबाबत कळविले. रेस्क्यु चॅरिटेबल ट्रस्टचे हर्षद नागरे, अमित तोडकर व वन विभागाचे गणू गायकवाड हे घटनास्थळी दाखल झाले व जखमी हरणाला उपचारांसाठी घेऊन गेले.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

Sorry, there are no polls available at the moment.

Related Articles