♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

Heavy Traffic in Khadakwasla: नांदेड सिटी वाहतूक विभागाचे ढिसाळ नियोजन; खडकवासला धरण चौकात दिवसभर वाहतूक कोंडी;पर्यटकांचा हिरमोड आणि स्थानिकही बेजार 

Heavy Traffic in Khadakwasla: नांदेड सिटी वाहतूक विभागाचे ढिसाळ नियोजन; खडकवासला धरण चौकात दिवसभर वाहतूक कोंडी;पर्यटकांचा हिरमोड आणि स्थानिकही बेजार 

(निलेश बोरुडे: संपादक – द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस)

खडकवासला: सुट्टीचा दिवस आणि पावसाचे वातावरण असल्याने आज सकाळपासून खडकवासला, सिंहगड, पानशेत या परिसरात फिरण्यासाठी, हॉटेल, फार्महाऊस, रिसॉर्ट वर जाण्यासाठी पर्यटकांच्या वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. दुपारपासून कमीअधिक प्रमाणात खडकवासला धरण चौकात सुरू झालेली वाहतूक कोंडी नंतर मोठ्या प्रमाणात वाढत गेली व सायंकाळ पासून रात्री अकरा वाजेपर्यंत अनेक पर्यटक वाहतूक कोंडीत अडकून पडले होते. स्थानिकांचेही या वाहतूक कोंडीमुळे घराबाहेर पडणे अवघड झाले होते.

दुपारपासून वाहतूक कोंडी झालेली असताना नांदेड सिटी वाहतूक विभागाचे पोलीस कुठेही दिसत नसल्याचे अनेक नागरिकांनी ‘द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’शी संपर्क साधून सांगितले. पाचशे मिटर अंतर जाण्यासाठी वाहतूक कोंडीमुळे दिड ते दोन तास लागत असल्याने पर्यटकांचा हिरमोड झाला होता तर स्थानिक बेजार झाले होते. फेसबुक, Twitter, इन्स्टाग्राम अशा समाज माध्यमांवर नागरिक,पर्यटक तीव्र शब्दांत या वाहतूक कोंडीबाबत संताप व्यक्त करत आहेत.

शनिवार व रविवारी नांदेड फाटा ते खडकवासला धरण चौपाटी या टप्प्यात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नांदेड सिटी वाहतूक विभागाने सुक्ष्म नियोजन करुन प्रत्येक ठिकाणी बंदोबस्त तैनात करणे आवश्यक आहे. तसेच खडकवासला धरण चौपाटी परिसरात बेशिस्तपणे वाहने लावून जाणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी जास्त प्रमाणात वाहतूक पोलीस तैनात असणे आवश्यक आहेत मात्र सद्यस्थितीत वाहतूक पोलीसांना याचे गांभीर्य असल्याचे दिसून येत नाही. यापुढील काळात खडकवासला धरण चौपाटी परिसरात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक विभागाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

Sorry, there are no polls available at the moment.

Related Articles