♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

Black Out: खडकवासला ते किरकटवाडी फाटा पथदिवे बंद; मागील एक महिन्यापासून रस्त्यावर अंधार;पालिकेचे दुर्लक्ष

Black Out: खडकवासला ते किरकटवाडी फाटा पथदिवे बंद; मागील एक महिन्यापासून रस्त्यावर अंधार;पालिकेचे दुर्लक्ष

खडकवासला: मागील सुमारे एक महिन्यापासून सिंहगड रस्त्यावरील खडकवासला ते किरकटवाडी फाटा दरम्याने पथदिवे पूर्ण बंद असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. पायी चालणाऱ्या नागरिकांना जीव मुठीत धरून चालावे लागत असून पालिकेच्या संबंधित विभागाचे मात्र याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे.
पालिकेकडून काही दिवसांपूर्वी रस्त्याच्या कडेने केबल टाकण्यासाठी खोदकाम करण्यात आले आहे. या खोदकामादरम्यान पथदिव्यांच्या केबल तुटल्या आहेत. तेव्हापासून पूर्ण पथदिवे बंद आहेत. सुमारे एक महिन्यापासून रस्त्यावर काळोख आहे. असे असताना पालिकेकडून दुरुस्तीकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे.
अगोदरच वाहनांच्या संख्येच्या तुलनेत रस्ता अरुंद आहे. परिसरातील ऐतिहासिक व पर्यटन स्थळांमुळे दिवसरात्र मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. दोनच दिवसांपूर्वी एका रिक्षाने धडक दिल्याने चालण्यासाठी निघालेल्या खडकवासला येथील व्यक्तीचा दुर्दैवाने मृत्यू झाला आहे. त्यामुळे पालिकेने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. तुटलेल्या केबलची दुरुस्ती करुन तातडीने पथदिवे सुरू करण्याची मागणी नागरिक करत आहेत.

“अंधार असल्याने महिलांची गैरसोय होत आहे. तसेच अपघाताचाही धोका आहे. तातडीने पथदिवे सुरू करण्यात यावेत.” सौरभ मते, माजी सरपंच खडकवासला.

“मागील सुमारे महिनाभरापासून रस्त्यावर अंधार आहे. इतके दिवस अधिकाऱ्यांना दिसले नाही का? ” नागरिक, मुकाईनगर 

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

Sorry, there are no polls available at the moment.

Related Articles