
Decomposed Dead Body: एनडीए-बहुली रस्त्यापासून काही अंतरावर आढळला कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह; आगळंबे की कुडजे या गावांच्या हद्दीत वरुन हवेली-उत्तमनगर पोलीसांमध्ये वाद; तपास राहिला लांबच
Decomposed Dead Body: एनडीए-बहुली रस्त्यापासून काही अंतरावर आढळला कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह; आगळंबे की कुडजे या गावांच्या हद्दीत वरुन हवेली-उत्तमनगर पोलीसांमध्ये वाद; तपास राहिला लांबच
पुणे: खडकवासला धरणालगत एनडीए-बहुली रस्त्यापासून काही अंतरावर आगळंबे व कुडजे या गावांच्या सीमेलगत एका तरुणाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला आहे. धक्कादायक म्हणजे याबाबत तपास करणे तर दूरच मात्र हवेली पोलीस स्टेशन व उत्तमनगर पोलीस स्टेशन यांच्यामध्ये हद्दीवरुन वाद सुरू आहे. अद्याप मृतदेहाची ओळख पटलेली नाही.
एनडीए-बहुली रस्त्यालगत असलेल्या गावांमध्ये पुणे ग्रामीण व पुणे शहर असे गुंतागुंतीचे पोलीस कार्यक्षेत्र आहे. काही गावांना पुणे शहरचे उत्तमनगर पोलीस स्टेशन तर काही गावांना पुणे ग्रामीण चे हवेली पोलीस स्टेशन आहे. अनेक वेळा या परिसरात घडलेल्या गुन्हेगारी घटनांदरम्यान हद्दीवरुन संभ्रम निर्माण झालेला आहे. आजही तसाच प्रसंग निर्माण झाला आहे.
आज दुपारच्या सुमारास आगळंबे व कुडजे या गावांच्या सीमेलगत कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली होती. याबाबत पोलीसांना माहिती देण्यात आली. दोन्ही पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले मात्र नेमकी हद्द कुणाची यावरुन वाद सुरू होता. अखेर मृतदेह आढळलेली जागा उत्तमनगर पोलीस स्टेशन हद्दीत असल्याचे समोर आले आहे. पोलीस तपासात अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.