♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

तू तुझ्या बापाला पैसे का पाठवतो मी फाशी घेईन….. सारखी धमकी देते काय, तुला दाखवतो फाशी काय असते म्हणत पतीने दाबला गळा; मृतदेह पोत्यात भरुन फेकण्यासाठी जाताना नांदेड सिटी पोलीसांनी पाठलाग करुन पकडले रंगेहाथ 

तू तुझ्या बापाला पैसे का पाठवतो मी फाशी घेईन….. सारखी धमकी देते काय, तुला दाखवतो फाशी काय असते म्हणत पतीने दाबला गळा; मृतदेह पोत्यात भरुन फेकण्यासाठी जाताना नांदेड सिटी पोलीसांनी पाठलाग करुन पकडले रंगेहाथ 

 

पुणे: नांदेड सिटी पोलीस स्टेशन हद्दीत काल रात्री गस्त घालणाऱ्या पोलीसांच्या सतर्कतेमुळे धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पत्नीचा गळा दाबून खून करून मृतदेह पोत्यात भरुन दुचाकीवरून फेकण्यासाठी घेऊन जात असताना आरोपी राजेशकुमार रामनाईक निशाद (वय 28, रा. समृद्धी ग्रीन्स, साईधाम सोसायटी, लायगुडे मळा, धायरी) याला रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. बबीता राजेशकुमार निशाद (वय 25) असे मृत पत्नीचे नाव आहे.

बबीत आणि राजेशकुमार यांचा प्रेमविवाह झालेला होता. दोघेही आपापल्या घरच्यांशी बोलत नव्हते. आरोपी राजेशकुमार हा आपल्या वडीलांना अधूनमधून पैसे पाठवत होता. याची माहिती बबीताला कळल्यावर तिने आरोपी राजेशकुमार याच्याबरोबर वाद घालायला सुरुवात केली. या कारणास्तव दोघांमध्ये सातत्याने भांडण होत होते. भांडण झाले की पत्नी बबीता ही फाशी घेण्याची धमकी द्यायची. असे अनेक वेळा घडले होते.

मृत बबीता निशाद

काल दोघांमध्ये भांडण झाल्यानंतर बबीता म्हटली फाशी घेऊन मरते, तेव्हा चिडलेल्या आरोपी राजेशकुमार याने तुला फाशी काय असते आज दाखवतोच असे म्हणत तिचा गळा दाबला. त्यात बबीताचा मृत्यू झाला. आरोपी राजेशकुमार याने बबीताचा मृतदेह पोत्यात भरला व फेकून देण्यासाठी डोंगराकडे निघाला. नांदेड सिटी पोलीस स्टेशनच्या गस्त घालणाऱ्या पोलीसांना दुचाकीवरून जात असलेल्या आरोपीचा संशय आल्याने त्यांनी पाठलाग सुरू केला. त्याला पकडल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत पोलीस कर्मचारी ज्ञानेश्वर बबन आखाडे यांनी फिर्याद दिली असून आरोपी राजेशकुमार निशाद याच्या विरोधात गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

Sorry, there are no polls available at the moment.

Related Articles