
IMPACT: कोल्हेवाडी चौकातील उघड्या विद्युत पेटीची तातडीने दुरुस्ती; द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’ने लक्ष वेधल्यानंतर महावितरणकडून दखल
IMPACT: कोल्हेवाडी चौकातील उघड्या विद्युत पेटीची तातडीने दुरुस्ती; द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’ने लक्ष वेधल्यानंतर महावितरणकडून दखल
किरकटवाडी: कोल्हेवाडी चौकातील उघड्या विद्युत पेटीची महावितरणकडून तातडी दुरुस्ती करण्यात आली आहे. द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’ने लक्ष वेधल्यानंतर महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता अविनाश कळढोणे, सहाय्यक अभियंता शिवलिंग बोरे यांनी तातडीने कर्मचाऱ्यांना सूचना देऊन विद्युत पेटीची दुरुस्ती करुन घेतल्याने संभाव्य धोका टळला आहे.

कोल्हेवाडी चौकातील वर्दळीच्या ठिकाणी महावितरणची विद्युत पेटी उघडी होती. सकाळ संध्याकाळ या ठिकाणी नागरिकांची मोठी वर्दळ असते. चूकून एखाद्या लहान मुलाचा या पेटीतील विद्युत तारांना स्पर्श झाला असता तर मोठी दुर्घटना घडली असती. त्यामुळे गांभीर्य ओळखून द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’ने याबाबत बातमी करुन आज सकाळी महावितरण प्रशासनाचे लक्ष वेधले होते.
बातमी आल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने कार्यवाहीला सुरुवात केली. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी आवश्यक दुरुस्ती करुन विद्युत पेटीचा दरवाजा बंद करुन घेतला. बातमी आल्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये महावितरणने तत्परतेने काम करुन घेतले. संभाव्य धोका टळल्याने नागरिक याबाबत समाधान व्यक्त करत आहेत.
हक्काचे व्यासपीठ!
माध्यमांची मक्तेदारी, बातमीदारांचा मी पणा आणि ठराविक बातम्याच करायच्या आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांकडे हेतुपुरस्सर डोळेझाक करायची याला द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’ने उघडे पाडले आहे. नागरिकांची समस्या छोटी असो की मोठी ती सोडविण्यासाठी द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस हक्काचे माध्यम झाले आहे. परिणामी नागरिक आपल्या व्यथा निःसंकोचपणे द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस कडे मांडत असून शासकीय-प्रशासकीय पातळीवरुनही त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. केवळ दिड वर्षांत द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेसच्या वेब पेजला 3 कोटी 60 लाखांपेक्षा जास्त वाचकांनी दिलेली भेट ही माध्यम क्षेत्रातील गुणवत्तेची पोचपावती आहे.