
महावितरणच्या उघड्या पेटीचा धोका; कोल्हेवाडी चौकातील वर्दळीच्या ठिकाणी नेहमी उघड्या असलेल्या पेटीची तातडीने दुरुस्ती करुन घेण्याची मागणी
महावितरणच्या उघड्या पेटीचा धोका; कोल्हेवाडी चौकातील वर्दळीच्या ठिकाणी नेहमी उघड्या असलेल्या पेटीची तातडीने दुरुस्ती करुन घेण्याची मागणी
किरकटवाडी: कोल्हेवाडी चौकातील मेजवानी हॉटेल च्या समोर महावितरणची मोठमोठ्या केबलचे कनेक्शन असलेली पेटी सतत उघडी असल्याने विजेचा धक्का लागून दुर्घटना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या पेटीच्या दरवाजांची तातडीने दुरुस्ती करुन आवश्यक प्रतिबंधक कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहेत.
कोल्हेवाडी चौकात सकाळ व संध्याकाळी मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. शालेय विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक येजा करत असतात. तसेच या ठिकाणी वेगवेगळ्या व्यावसायिक आस्थापना असल्याने ग्राहकांची वर्दळ असते. अशा वर्दळीच्या ठिकाणी महावितरणची विद्युत पेटी असून या पेटीचे दरवाजे उघडे आहेत. परिणामी विजेचा धक्का लागून अपघात होण्याची शक्यता असल्याने या विद्युत पेटीची तातडीने दुरुस्ती करुन घेण्याची मागणी नागरिक करत आहेत.