
मटक्याचा नंबर लागलाय पैसे घेऊन येतो…. येताना तुला खायला घेऊन येतो; आईशी बोलून गेला आणि बुधवार पासून बेपत्ता झालेल्या तरुणाचा खडकवासला धरणात गोऱ्हे बुद्रुक गावच्या हद्दीत आढळला मृतदेह; परिसरात खळबळ
मटक्याचा नंबर लागलाय पैसे घेऊन येतो…. येताना तुला खायला घेऊन येतो; आईशी बोलून गेला आणि बुधवार पासून बेपत्ता झालेल्या तरुणाचा खडकवासला धरणात गोऱ्हे बुद्रुक गावच्या हद्दीत आढळला मृतदेह; परिसरात खळबळ
पुणे:”मटक्याचा आकडा लागला आहे. पैसे घेऊन येतो आणि येताना तुला खायला आणतो,” असं आईला सांगून घरातून निघून गेलेल्या एकतीस वर्षीय तरुणाचा खडकवासला धरणाच्या पाण्यात गोऱ्हे बुद्रुक गावच्या हद्दीत मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. लखन रामशिवराम क्षीरसागर (वय 31, रा. नांदेड गाव, सिंहगड रोड) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. दरम्यान या घटनेमुळे अवैध धंद्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
बुधवार 19 मार्च रोजी लखन क्षीरसागर आईशी बोलून घरातून गेला होता. त्याला मटका खेळण्याचे व्यसन होते. मटक्याचा आकडा लागला असून पैसे घेऊन येतो व येताना तुला खायला घेऊन येतो असं बोलून तो घरातून गेला परंतु नंतर त्याच्याशी संपर्क झाला नाही.
नातेवाईकांनी परिसरात शोधाशोध केली परंतु तो मिळून न आल्याने नांदेड सिटी पोलीस स्टेशन मध्ये तो बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. आज सकाळी सिंहगड रस्त्याला लागून गोऱ्हे बुद्रुक येथे हवेली पोलीस स्टेशनच्या हद्दीत खडकवासला धरणाच्या पाण्यात लखनचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून अवैध धंद्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याबाबत सखोल तपास करुन घटनेमागील सत्यता पोलीसांनी समोर आणणे आवश्यक आहे.