♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

नांदोशी-सणसनगर साठी पालिकेने टाकलेली नवीन जलवाहिनी अवघ्या काही दिवसांतच जागोजागी फुटली; लाखो लिटर पाण्याची होतेय गळती; दुरुस्तीकडे दुर्लक्ष 

नांदोशी-सणसनगर साठी पालिकेने टाकलेली नवीन जलवाहिनी अवघ्या काही दिवसांतच जागोजागी फुटली; लाखो लिटर पाण्याची होतेय गळती; दुरुस्तीकडे दुर्लक्ष 

 

पुणे: सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील नांदोशी,सणसनगर, वांजळवाडी या गावांसाठी अवघ्या काही दिवसांपूर्वी पालिकेने नव्याने टाकलेली जलवाहिनी जागोजागी फुटली आहे. अगोदरच नांदोशी, सणसनगर या गावांना दोन दिवसांआड पाणी येत आहे, आता जलवाहिनी फुटल्याने पाण्याची समस्या गंभीर बनत चालली आहे. दुसऱ्या बाजूला पालिकेकडून या जलवाहिनीच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे.

GBS आजाराच्या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांनी नांदोशी गावाला भेट देऊन पाहणी केली होती. ज्या ठिकाणी जलवाहिनी बदलण्याची गरज आहे तेथील काम विनाविलंब करुन घेण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या होत्या. त्यानंतर घाईघाईने जागोजागी नवीन जलवाहिनी टाकून घेण्यात आली मात्र केवळ ‘निधीवर डोळा ठेवून काम झाले की काय’ असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण अवघ्या काही दिवसांत ही जलवाहिनी फुटली असून लाखो लिटर पाण्याची नासाडी होत आहे.

मागील पाच ते सहा दिवसांपासून जलवाहिनी फुटलेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती सुरू असून डोह तयार झाले आहेत. महत्वाचे म्हणजे ज्या तत्परतेने कमिशनच्या मोहापायी नवीन लाईन टाकण्याचे काम करुन घेण्यात आले ती तत्परता दुरुस्ती करताना दिसत नाही. या संपूर्ण कामाची चौकशी होणे आवश्यक आहे. नवीन जलवाहिनी फुटण्याची कारणे शोधून दोषींवर कारवाई करण्यात यायला हवी. अन्यथा नागरिकांचा कररुपी पैसा या पाण्याप्रमाणे अधिकारी आणि ठेकेदारांच्या खिशात मुरत राहिल.

नांदोशी येथे जलवाहिनी फुटल्याने मोठा डोह तयार झाला आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

Sorry, there are no polls available at the moment.

Related Articles