
अवैध ताडी गुत्त्यावर नांदेड सिटी पोलीसांचा छापा;अडीच हजारांचा मुद्देमाल जप्त; दोघांविरोधात गुन्हा दाखल
अवैध ताडी गुत्त्यावर नांदेड सिटी पोलीसांचा छापा;अडीच हजारांचा मुद्देमाल जप्त; दोघांविरोधात गुन्हा दाखल
पुणे: पुणे शहर पोलीस आयुक्तालयांतर्गत नव्याने सुरू झालेल्या नांदेड सिटी पोलीसांनी हद्दीतील अवैध धंद्यांच्या विरोधात धडक कारवाई सुरू केलेली असून एका ताडी गुत्त्यावर छापा टाकून अडीच हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी राहुल अशोक भंडारी (रा. नऱ्हे) व ईश्वर विवेक भंडारी (रा. धायरी फाटा) या दोघांविरोधात नांदेड सिटी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नांदेड सिटी पोलीस स्टेशन हद्दीत नांदेड सिटी गेटच्या समोर ताडी गुत्ता सुरू असल्याची माहिती गुन्हे शोध पथकाला मिळाली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक शिवाजी बुनगे यांच्या पथकाने मिळालेल्या माहितीनुसार संबंधित ठिकाणी छापा टाकला. सदर कारवाईत सुमारे अडीच हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच दोघांविरोधात नांदेड सिटी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नांदेड सिटी पोलीसांनी हद्दीतील अवैध धंद्यांवर सातत्याने कारवाई सुरू ठेवल्याने अवैध धंद्यावाले सैरभैर झाले आहेत. हवेली पोलीस स्टेशन असताना ‘आका’च्या आशिर्वादाने सर्व अवैध धंदे राजरोसपणे सुरू होते. नांदेड सिटी पोलीसांनी मात्र अवैध धंद्यांच्या विरोधात कठोर भूमिका घेतली आहे.