
मुख्यमंत्री कार्यालयाकडून ‘ द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’ च्या मागणीची दखल;नगरविकास सचिव डॉ के. एच. गोविंद राज आणि पुणे जिल्हाधिकाऱ्यांना आदिवासी कातकरी समाजाला हक्काचे घर देण्यासाठी कार्यवाही करण्याचे निर्देश
मुख्यमंत्री कार्यालयाकडून ‘ द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’ च्या मागणीची दखल;नगरविकास सचिव डॉ के. एच. गोविंद राज आणि पुणे जिल्हाधिकाऱ्यांना आदिवासी कातकरी समाजाला हक्काचे घर देण्यासाठी कार्यवाही करण्याचे निर्देश
पुणे: पिढ्यानपिढ्या जंगलात भटकंती करुन, नदी किनारी खेकडे, मासे पकडून आपलं जीवन जगणाऱ्या आदिवासी कातकरी नागरिकांना हक्काचा निवारा देण्यासाठी योग्य कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाकडून नगरविकास सचिव डॉ के.एच. गोविंद राज व पुणे जिल्हाधिकारी डॉ जितेंद्र डुडी यांना देण्यात आले आहेत. द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’ने लक्ष वेधल्यानंतर ही कार्यवाही करण्यात आली असून त्याबाबत द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’ला मुख्यमंत्री कार्यालयाने ई-मेल द्वारे कळविण्यात आले आहे.
खडकवासला, एनडीए गेट, गोऱ्हे बुद्रुक, डोणजे, वरदाडे, आगळंबे व परिसरातील आदिवासी कातकरी समाजातील नागरिकांना हक्काचा निवारा नाही. मोडक्या तोडक्या कुडाच्या झोपड्यांमध्ये हे नागरिक राहत आहेत. उन्हाळा,पावसाळा व हिवाळा अशा तिन्ही ऋतुंमध्ये यांना हाल सहन करावे लागतात.
द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’ने याबाबत मुख्यमंत्री कार्यालयाचे लक्ष वेधून या नागरिकांना घरासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. तसेच उपलब्ध सरकारी जागेबाबत माहिती दिली होती. त्याची दखल घेऊन मुख्यमंत्री कार्यालयाने नगरविकास सचिव डॉ के एच गोविंद राज व पुणे जिल्हाधिकारी डॉ जितेंद्र डुडी यांना योग्य कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी डॉ जितेंद्र डुडी यांची भेट घेतली असता महिनाभरात याबाबत कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती दिली होती. मुख्यमंत्री कार्यालयाने लक्ष घातल्याने हा प्रश्न लवकरात लवकर सुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आदिवासी कातकरी समाजासाठी ही अत्यंत दिलासादायक गोष्ट असणार आहे.