
हवेली उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या आजुबाजुला अवैध धंदेवाल्यांचा मेळा; नियमित मिळणाऱ्या तिर्थ प्रसादामुळे पुजारी प्रसन्न?
हवेली उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या आजुबाजुला अवैध धंदेवाल्यांचा मेळा; नियमित मिळणाऱ्या तिर्थ प्रसादामुळे पुजारी प्रसन्न?
सिंहगड: पुणे ग्रामीण पोलीस कार्यक्षेत्रातील हवेली पोलीस स्टेशन हद्दीत आणि त्यातही हवेली उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या आजुबाजुला राजरोसपणे अवैध धंदे सुरू असल्याचे दिसून येत आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी या अवैध धंद्याकंडे दुर्लक्ष करत असल्याने अवैध धंदेवाल्यांचा ‘तिर्थ प्रसाद’ पोचत असल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पुजारी त्यांच्यावर प्रसन्न झालेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
हवेली पोलीस स्टेशन हद्दीत गोऱ्हे बुद्रुक येथे हवेली उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय आहे. याअंतर्गत हवेली,पौड व वेल्हे असे तीन पोलीस स्टेशन येतात. तीनही पोलीस स्टेशन हद्दीत सध्या राजरोसपणे अवैध धंदे सुरू आहेत. धक्कादायक म्हणजे हवेली उपविभागीय कार्यालयाच्या आजूबाजूला अवैध धंदे सुरू आहेत. पुणे ग्रामीण मधील हवेली उपविभागीय कार्यालयाची हद्द सध्या अवैध धंद्यांसाठी सुकर व सुरक्षित समजली जात असल्याने या भागात अवैध धंदेवाल्यांचा अक्षरशः मेळा भरला आहे.
दुसऱ्या बाजूला उपविभागीय पोलीस अधिकारी या अवैध धंद्यांवर कारवाई करत नसल्याने त्यांचा जाहिर आशिर्वाद आहे का? की वेळेवर ‘प्रसाद’ मिळत असल्याने ते खुश आहेत? असा सवाल उपस्थित होत आहे. जर तसे नसेल तर मग अवैध धंद्यावर कारवाई का होत नाही? याची माहिती समोर येणं आवश्यक आहे. वरिष्ठ कार्यालय म्हणून उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी संबंधित पोलीस निरीक्षकांची जबाबदारी निश्चित करुन सर्व अवैध धंदे बंद करण्यासाठी मोहिम हाती घेणे आवश्यक आहे. हवेली उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पुजारी हद्दीतील अवैध धंद्यांच्या विरोधात अशी मोहिम राबवितात का हे येत्या काळात पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.