♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

Suicide Incident:किरकटवाडी येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; चिठ्ठी लिहून व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी संपविले जीवन 

किरकटवाडी येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; चिठ्ठी लिहून व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी संपविले जीवन 

 

किरकटवाडी: किरकटवाडी येथील बापूजीबूवा नगर येथे व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी एका अठ्ठावीस वर्षीय तरुणाने चिठ्ठी लिहून ठेवत छताला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आकाश संजय गव्हाणे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. तो मुळचा मुंबई येथील असून खोलीत एकटाच राहण्यासाठी होता व कर्वेनगर भागात कामासाठी असल्याची माहिती मिळाली आहे.

तरुणाने छताला गळफास घेतल्याची माहिती नांदेड सिटी पोलीस स्टेशनला मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिवाजी बुनगे, स्वप्नाली गायकवाड, पोलीस हवालदार पंकज वनवे, पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी क्षिरसागर, स्वप्निल मगर हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते. खोलीचा दरवाजा आतून बंद असल्याने दरवाजा तोडल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

आत्महत्येचे नेमके कारण समजले नसून तरुणाने चिठ्ठी लिहून ठेवली आहे. एकटाच राहण्यासाठी असल्याने अधिक माहिती अद्याप समोर आलेली नाही. मिळालेली चिठ्ठी तसेच घरमालक, शेजारी यांच्याकडे विचारपूस करुन पोलीस माहिती मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत. तणावाखाली असताना चिठ्ठी लिहिल्याची शक्यता असल्याने हस्ताक्षर नीट समजून येत नाही. नांदेड सिटी पोलीस अधिक तपास करत आहेत.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

Sorry, there are no polls available at the moment.

Related Articles