♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

किरकटवाडी येथील नानानगर रस्त्याची दुरवस्था; पालिकेच्या पथ विभागाचे दुर्लक्ष; रहिवासी हैराण

किरकटवाडी येथील नानानगर रस्त्याची दुरवस्था; पालिकेच्या पथ विभागाचे दुर्लक्ष; रहिवासी हैराण

 

किरकटवाडी: येथील गावठाणापासून नानासाहेब नगरकडे जाणाऱ्या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली आहे. पालिकेच्या पथ विभागाकडून डागडुजी करण्यात येत नसल्याने या भागातील रहिवासी हैराण झाले आहेत. पालिकेच्या असंवेदनशील कारभाराविरोधात नागरिक संताप व्यक्त करत आहेत.

नाना नगर भागात मोठी लोकवस्ती आहे. मोठे गृहप्रकल्प या भागात असल्याने नागरिकांची सातत्याने वर्दळ असते. येथील रस्त्यावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडले असून चेंबर खचलेले आहेत. जुना कॉंक्रीटचा रस्ता भेगा पडल्याने व तुटल्याने खराब झालेला आहे. परिणामी येजा करताना नागरिकांना कसरत करावी लागते. दुचाकी घसरून सातत्याने अपघात होत आहेत.

रस्ता मोठ्या प्रमाणात खराब झालेला असताना पालिकेचा संबंधित विभाग मात्र दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. साधी डागडुजी करण्यात येत नसल्याने कर भरुन नेमकं मिळतंय काय? असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. त्यामुळे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे तातडीने लक्ष देऊन रस्त्याची डागडुजी करून घेणे आवश्यक आहे.

 

” पालिकेचे अधिकारी या भागात येत नाहीत का? त्यांना रस्त्याची दुरवस्था दिसत नाही का? कर कशासाठी गोळा केला जातो? याची उत्तरे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी द्यावीत. पालिका किरकोळ सुविधा देऊ शकत नाही का?” सुमित शिंदे, रहिवासी.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

Sorry, there are no polls available at the moment.

Related Articles