♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

ACB Raid:8 अ उताऱ्यावर नाव लावण्यासाठी 18 हजार लाचेची मागणी; एका गावचा सरपंच पती तर दुसऱ्या गावचा सरपंच रंगेहाथ एसीबीच्या जाळ्यात; सिंहगड रोड परिसरात खळबळ 

ACB Raid:8 अ उताऱ्यावर नाव लावण्यासाठी 18 हजार लाचेची मागणी; एका गावचा सरपंच पती तर दुसऱ्या गावचा सरपंच रंगेहाथ एसीबीच्या जाळ्यात; सिंहगड रोड परिसरात खळबळ 

 

पुणे: गाव नमुना 8 अ उताऱ्यावर नाव लावण्यासाठी 18 हजार रुपयांची लाच मागीतल्याप्रकरणी वरघड (ता. वेल्हे) गावच्या महिला सरपंचाचे पती नथुराम कोंडीबा डोईफोडे( रा. रायकर मळा धायरी) यांना पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली आहे. तर लाच मागणीस प्रवृत्त करणारे गिवशी आंबेगाव (ता. वेल्हे) गावचे सरपंच बाळासाहेब धावू मरगळे (रा. किरकटवाडी) यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिंहगड रस्त्यावरील अतुल्य हॉटेल च्या पार्कींगमध्ये ही कारवाई करण्यात आली असून यामुळे सिंहगड रोड परिसरात खळबळ उडाली आहे.

8 अ उताऱ्यावर नाव लावण्यासाठी तक्रारदाराने वरघड ग्रामपंचायत कार्यालयात संपर्क साधला असता सरपंच सुवर्णा नथुराम डोईफोडे व पती नथुराम डोईफोडे यांनी 18 हजार रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदाराने याबाबत पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिल्यानंतर पडताळणी केली असता लाच मागणी केली जात असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार सिंहगड रस्त्यावरील हॉटेल परिसरात सापळा लावण्यात आला व आरोपींना रंगेहाथ पकडण्यात आले.

वरघड सरपंचाचे पती नथुराम कोंडीबा डोईफोडे यांच्यावर प्रत्यक्ष लाच घेतल्याप्रकरणी तर गिवशी आंबेगाव चे सरपंच बाळासाहेब धावू मरगळे यांच्यावर लाच घेण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी नांदेड सिटी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक शिरिष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक शितल जाणवे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक प्रेम वाघमोरे याबाबत अधिक तपास करत आहेत.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

Sorry, there are no polls available at the moment.

Related Articles