♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

Inspirational Story:डोळ्यांसमोर व्यवसायाची राखरांगोळी झाली पण तो खचला नाही! महिन्याच्या आत पुन्हा उभा केला व्यवसाय; खडकवासला येथील तरुण व्यावसायिकाची नव्या जोमाने भरारी 

डोळ्यांसमोर व्यवसायाची राखरांगोळी झाली पण तो खचला नाही! महिन्याच्या आत पुन्हा उभा केला व्यवसाय; खडकवासला येथील तरुण व्यावसायिकाची नव्या जोमाने भरारी 

 

खडकवासला: एरवी तो कधी फोन बंद करत नाही परंतु ‘त्या दिवशी’ तो फोन बंद करुन नेहमी पेक्षा लवकर घरी गेला. दिवसभराच्या धावपळीमुळे लगेच झोप लागली परंतु केवळ क्षणभरासाठी. रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास अचानक आरडाओरड करत काही तरुण धावत आले आणि दरवाजा वाजवत तुमच्या दुकानाला आग लागली आहे लवकर पळा असे सांगू लागले. घरातील सर्व दचकून उठले आणि दुकानाकडे पळाले. समोरचं भयानक दृश्य पाहून सर्वांना धक्का बसला.

8 जानेवारी 2025 रोजी खडकवासला येथील तरुण मंडप व्यावसायिक उमेश गोऱ्हे यांच्या ‘उमेश मंडप डेकोरेटर्स’ या दुकानाला हुल्लडबाज तरुणांनी वाजविलेल्या फटाक्यांमुळे आग लागली होती. आगीत सुमारे चाळीस ते पन्नास लाख रुपयांचे सामान, महागड्या वस्तू जळून खाक झाल्या. आगीचे रूप इतके उग्र होते की एकही वस्तू वाचली नाही. उरले ते फक्त अश्रू. 2013 सालापासून उमेश गोऱ्हे यांनी हळूहळू उभा केलेल्या व्यवसायाची दोन तासांत राख झाली होती. पूर्ण कुटुंबीय, नातेवाईक व मित्रपरिवार हळहळ व्यक्त करत होता.

लाखो रुपयांचे नुकसान तर झालेच होते परंतु पूर्ण अर्थचक्र थांबल्याने उमेश गोऱ्हे हेही सुरुवातीला खचले होते परंतु त्यांनी स्वतःला सावरलं. आहे त्या ठिकाणीच तातडीने पुन्हा नवीन कामाला सुरुवात केली आणि पुन्हा दुकान बांधून घेतले. सर्व यंत्रणा पुन्हा उभी केली. आवश्यक वस्तूंची खरेदी केली आणि गणेश जयंतीपासून म्हणजे 1 फेब्रुवारी पासून पुन्हा नव्या जोमाने व्यवसायाला सुरुवात केली आहे. आगीच्या घटनेला अजून महिनाही पूर्ण झालेला नाही मात्र पूर्ण दुकान पुन्हा उभे राहिले आहे. आलेल्या संकटामुळे खचून न जाता, धीर न सोडता संयमाने परिस्थिती हाताळून त्यावर मात करुन पुन्हा उभारी घेता येते याचा वस्तुपाठ उमेश गोऱ्हे या तरुण व्यावसायिकाने घालून दिला आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

Sorry, there are no polls available at the moment.

Related Articles