♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

खानापूर येथून आणखी एका कृषी पंपाची चोरी; शेतकरी हैराण ; चोर पकडण्यात हवेली पोलीसांना अपयश

खानापूर येथून आणखी एका कृषी पंपाची चोरी; शेतकरी हैराण ; चोर पकडण्यात हवेली पोलीसांना अपयश

खानापूर: खानापूर व लगतच्या परिसरात मागील काही दिवसांपासून कषी पंप चोरीला जाण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. सुभाष दिनकर जावळकर या शेतकऱ्याचा कृषीपंप दोन दिवसांपूर्वी अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेला आहे. दरम्यान तक्रार दाखल करुन घेण्यासाठी हवेली पोलीसांकडून पंप खरेदीच्या पावत्यांची मागणी होत असल्याने जुन्या झालेल्या पंपांच्या पावत्या आणायच्या कोठून असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे. चोऱ्या रोखण्याऐवजी हवेली पोलीस पळवाट शोधत असल्याचे दिसत आहेत.
काही दिवसांपूर्वी खानापूर येथील शंकर संतू जावळकर व तुकाराम विठोबा जावळकर या शेतकऱ्यांचे गोऱ्हे खुर्द गावच्या हद्दीतून कृषीपंप चोरीला गेले होते. त्यावेळीही शेतकरी तक्रार करण्यासाठी हवेली पोलीस ठाण्यात गेले असता त्यांच्याकडे पावत्यांची मागणी करण्यात आली होती व गुन्हा दाखल करुन घेण्यास टाळाटाळ करण्यात आली होती. त्यामुळे चोर आणि पोलीस अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडले आहेत.
कृषी पंपांची चोरी करणारे चोर सराईत असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. चोर पकडण्यासाठी हवेली पोलीस ठोस कारवाई करत नसल्याने चोऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. सध्या पिकांना पाणी देण्याची आवश्यकता असताना कृषी पंप चोरीला जात असल्याने शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान होत आहे. याबाबत तातडीने दखल घेऊन चोऱ्या रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई होणे आवश्यक आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

Sorry, there are no polls available at the moment.

Related Articles