♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

तातडीच्या उपाययोजनांवर भर द्या; नांदेड फाटा येथील विहिरीच्या पाहणी दरम्यान रुपाली चाकणकर यांच्या पालिका अधिकाऱ्यांना सूचना 

तातडीच्या उपाययोजनांवर भर द्या; नांदेड फाटा येथील विहिरीच्या पाहणी दरम्यान रुपाली चाकणकर यांच्या पालिका अधिकाऱ्यांना सूचना 

 

सिंहगड रोड: GBS आजाराचा प्रादुर्भाव वाढत असल्याने बाधित रुग्णांवर उपचार, काटेकोर दैनंदिन आढावा व प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना यावर भर द्यावा आणि नागरिकांना पिण्यासाठी स्वच्छ पाण्याचा पुरवठा करण्यात यावा अशा सूचना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना दिल्या. रुपाली चाकणकर यांनी पाणीपुरवठा विहीर व परिसराची पाहणी करुन स्थानिक पदाधिकारी व नागरिकांकडून समस्या जाणून घेतल्या व त्यानुसार आवश्यक कार्यवाही करण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

किरकटवाडी, नांदेड, नांदोशी, सणसनगर, खडकवासला धायरी या भागासाठी जलशुद्धीकरण प्रकल्प उभारणीसाठी शासनाकडे पाठपुरावा तर करण्यात येणार आहेच परंतु सध्याची परिस्थिती पाहता तातडीने काही उपाययोजना करुन परिस्थिती नियंत्रणात आणून पालिकेच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांना दिलासा देणे गरजेचे आहे. जे रुग्ण उपचार घेत आहेत त्यांच्यावरही संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी बारकाईने लक्ष ठेवून दैनंदिन आढावा घेणे आवश्यक आहे. नागरिकांमध्ये प्रभावी जनजागृती व्हावी यासाठी घरोघरी जाऊन खबरदारी घेण्याबाबत आवश्यक मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. शासन स्तरावर पाणीपुरवठ्याबाबत आवश्यक कार्यवाही तर करण्यात येईलच परंतु सध्या अधिकाऱ्यांनी तातडीच्या उपाययोजनांवर अधिक भर द्यावा अशा सूचना चाकणकर यांनी दिल्या.

पालिकेच्या अधिकाऱ्यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना, ड्रेनेज लाईन दुरुस्ती, जलवाहिन्या दुरुस्ती व इतर सुरु करण्यात आलेल्या कामांबाबत रुपाली चाकणकर यांना माहिती दिली. यावेळी खडकवासला गावचे माजी सरपंच सौरभ मते, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी सागर कोल्हे इतर पदाधिकारी, नागरिक व पालिकेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

Sorry, there are no polls available at the moment.

Related Articles