♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

ज्या छडीने घडवले ती छडी पुन्हा द्या ! तब्बल वीस वर्षांनी भरलेल्या शाळेत विद्यार्थ्यांचा शिक्षकांकडे भावनिक आग्रह !

ज्या छडीने घडवले ती छडी पुन्हा द्या ! तब्बल वीस वर्षांनी भरलेल्या शाळेत विद्यार्थ्यांचा शिक्षकांकडे भावनिक आग्रह !

 

पुणे: बदललेले कायदे, सोशल मिडियातून पसरणारी माहिती आणि अतिसंवेदनशील झालेले पालक यांमुळे ‘शिक्षा’ करायची म्हटलं तरी विद्यार्थ्यांच्या अगोदर शिक्षकांना धडकी भरते. परंतु एक काळ असा होता शिक्षकांच्या हातात छडी पाहिली की विद्यार्थ्यांना घाम फुटायचा. अनेक पिढ्या या छडीच्या धाकाने घडल्या आणि त्या पिढ्यांतील लाखो विद्यार्थी आज यशस्वीपणे विविध क्षेत्रांमध्ये काम करुन यशस्वी जीवन जगत आहेत. सिंहगड रस्त्यावरील वडगाव बुद्रुक येथील कै. चंद्रकांत दांगट पाटील माध्यमिक विद्यालयातून घडून गेलेल्या अशाच एका पिढीने वीस वर्षांपूर्वीच्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा द्यायचे ठरवले. व्हॉट्स ॲप गृपच्या माध्यमातून दहावी 2005 बॅचचे सत्तर माजी विद्यार्थी- विद्यार्थीनी एकत्र जमले आणि वीस वर्षांनी पुन्हा वर्ग भरला.

ज्या छडीने आयुष्य घडविले ती छडी पुन्हा एकदा हातावर द्या! असा भावनिक आग्रह माजी विद्यार्थ्यांनी शिक्षकांकडे केला. शिक्षकांनीही छडी देऊन आग्रह मान्य केला. दैनंदिन परिपाठ, गणित-इंग्रजीचे तास झाले. वीस वर्षांपूर्वीच्या आठवणींना उजाळा देत शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये गप्पागोष्टी झाल्या. सर्व शिक्षक व शिक्षिकांसह, कर्मचाऱ्यांचाही माजी विद्यार्थ्यांनी सन्मान केला. शाळेला भेट वस्तू दिली. सर्वांनी एकत्रित स्नेहभोजनाचा आनंद घेतला. विद्यार्थी, शिक्षकांनी भावनिक होऊन मनोगत व्यक्त केले.

कार्याक्रमाच्या नियोजनासाठी वर्षा वाडेकर, कीर्तीवर्धन तांदळे, नम्रता भरेकर, हर्षल निकम, स्वाती उभे, कामिनी वाडेकर, अमोल सुतार, रविराज पवार, ज्योती ढेबे यांची समिती बनविण्यात आली होती. संस्थेचे कार्याध्यक्ष तसेच माजी नगरसेवक विकास दांगट हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मोहन तांबडे, मोहन कांबळे, डी.आर. जाधव, उदय सुपेकर, सुपेकर मॅडम, भांगे मॅडम, मोराळे सर, पवार सर, खाडे सर, डेंगळे सर, नवले मॅडम, चोले सर, सानप सर, धस सर, मुंडे सर, पाटील सर आदी शिक्षक उपस्थित होते. वर्षा वाडेकर व कीर्तीवर्धन तांदळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. शेवटी भावनिक होऊन सर्वांनी एकमेकांचा निरोप घेतला.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

Sorry, there are no polls available at the moment.

Related Articles