♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

‘त्या उपसरपंचाला’ मुंबई उच्च न्यायालयाचाही Mumbai High Court दणका; अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला; मारहाणीत तरुणाच्या मृत्यूनंतर सुमारे दोन महिन्यांपासून भाजप पदाधिकारी असलेला उपसरपंच आहे फरार 

‘त्या उपसरपंचाला’ मुंबई उच्च न्यायालयाचाही Mumbai High Court दणका; अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला; मारहाणीत तरुणाच्या मृत्यूनंतर सुमारे दोन महिन्यांपासून भाजप पदाधिकारी असलेला उपसरपंच आहे फरार 

 

पुणे: पुणे सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी गेलेल्या सिंहगड रस्त्याजवळील नऱ्हे गावच्या माजी उपसरपंचाचा अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे. तुम्ही अर्ज काढून घेता की आम्ही फेटाळून लावू अशी कान उघाडणी करत न्यायालयाने हा अर्ज फेटाळून लावला आहे. सुशांत सुरेश कुटे असे त्या भाजप पदाधिकारी असलेल्या माजी उपरसरपंचाचे नाव आहे.

25 नोव्हेंबर 2024 रोजी पहाटेच्या सुमारास नऱ्हे येथे पेट्रोल चोरीच्या संशयातून सुशांत कुटे व इतरांनी सार्थक नेताजी भगत या तरुणाला बेदम अमानुष मारहाण केली होती. उपचारांदरम्यान त्या तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर परिसरात खळबळ उडाली होती. दरम्यान आरोपी सुशांत कुटे याने अगोदर आपली राजकीय ताकद वापरुन सिंहगड रोड पोलिसांवर दबाव टाकून गुन्हा दडपण्याचा प्रयत्न केला होता. मात्र मृत तरुण हा मनसे पदाधिकाऱ्यांचा नातेवाईक असल्याने त्यांनी या प्रकरणात जर आरोपीला वाचविण्याचा प्रयत्न झाला तर रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.

पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी याप्रकरणी कठोर भूमिका घेत सर्व संबंधित आरोपींवर अगोदर हत्येच्या प्रयत्नाचा व तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर हत्येचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर इतर आरोपींना सिंहगड रोड पोलीसांनी तातडीने अटक केली होती मात्र सुशांत कुटे हा फरार झाला. काही दिवसांपूर्वी त्याने पुणे सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला तो फेटाळल्यानंतर त्याने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली मात्र घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मुंबई उच्च न्यायालयाने सुशांत कुटे याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. आरोपी आता सुप्रीम कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी जातो की पोलिसांना शरण येतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान दोन महिने होत आले तरी आरोपी पोलीसांना सापडत नसल्याने मृत तरुणाचे नातेवाईक संताप व्यक्त करत आहेत.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

Sorry, there are no polls available at the moment.

Related Articles