
IMPACT:खडकवासला धरणामागील रस्ता पथदिव्यांनी उजळला; द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’च्या बातमीची पालिका आयुक्तांकडून दखल; दोनच दिवसांत विद्युत विभागाकडून तत्परतेने दुरुस्ती
IMPACT:खडकवासला धरणामागील रस्ता पथदिव्यांनी उजळला; द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’च्या बातमीची पालिका आयुक्तांकडून दखल; दोनच दिवसांत विद्युत विभागाकडून तत्परतेने दुरुस्ती
खडकवासला: G-20 निमित्त मागील वर्षी खडकवासला धरणाच्या मागच्या बाजूला असलेल्या रस्त्याच्या कडेने बसविण्यात आलेल्या पथदिव्यांपैकी बहुतांश पथदिवे बंद असल्याने नागरिकांची गैरसोय होत असल्याबाबत द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’ने दोन दिवसांपूर्वी बातमी प्रसिद्ध केल्यानंतर पुणे मनपा आयुक्त राजेंद्र भोसले यांनी दखल घेऊन संबंधित विभागांची कान उघाडणी केली. बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून विद्युत विभागाकडून तातडीने दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात आली होती. आज सर्व परिसर प्रकाशमान झाला आहे.
द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’ ने बातमी प्रसिद्ध केल्यानंतर स्वतः पालिका आयुक्तांनी या विषयात लक्ष घातले. तातडीने दुरुस्ती करुन घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त नामदेव बजबळकर विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधून कामावर लक्ष ठेवून होते.
खांबांच्या आतमध्ये असणाऱ्या केबल उंदरांनी कुरतडल्या होत्या. खराब झालेल्या ठिकाणी केबल बदलून घेण्यात आली. विद्युत विभागाचे अधिकारी व कर्मचारी त्यासाठी तत्परतेने प्रयत्न करताना दिसत होते. अखेर दोन दिवस मेहनत घेऊन दुरुस्ती पूर्ण करण्यात आल्याने आज खडकवासला धरणामागील रस्ता उजळून निघाला आहे. चालण्यासाठी येणारे नागरिक, नोकरदार, स्थानिक नागरिक त्यामुळे समाधान व्यक्त करत आहेत. सुधारणात्मक दृष्टीकोन ठेवून द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’ने केलेल्या बातमीची पालिका प्रशासनाने तातडीने दखल घेऊन कारवाई करत नागरिकांची समस्या दूर केली.