
किरकटवाडी स्मशानभूमीतील तुटलेले नळ, वॉश बेसिनची तातडीने दुरुस्ती; द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’ IMPACT
किरकटवाडी स्मशानभूमीतील तुटलेले नळ, वॉश बेसिनची तातडीने दुरुस्ती; द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’ IMPACT
किरकटवाडी: किरकटवाडी स्मशानभूमीतील भौतिक सुविधांच्या दुरावस्थेबाबत ‘द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’ च्या माध्यमातून पालिका प्रशासनाचे लक्ष वेधल्यानंतर तातडीने कारवाई करण्यात आली आहे. तुटलेले पाच नळ, वॉश बेसिन नवीन बसवून घेण्यात आले असून पाणी गळती थांबविण्यासाठी आवश्यक ठिकाणी दुरुस्ती करुन घेण्यात आली आहे.

किरकटवाडी स्मशानभूमीतील शौचालय व इतर ठिकाणी असलेले नळ तुटलेले असल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात होते. तसेच वॉश बेसिनचीही तोडफोड करण्यात आल्याने अंत्यविधी, सावडण्याचा विधी व दशक्रिया विधीसाठी येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत होती. तसेच पाणी गळतीमुळे डबके तयार झाल्याने अस्वच्छता दिसत होती.
द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’च्या माध्यमातून काल याबाबत पालिका प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यात आले होते. त्याची तातडीने दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांनी आवश्यक कामे करु घेतली आहेत. द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’ने लक्ष वेधल्यानंतर अधिकाऱ्यांनी तातडीने कार्यवाही केल्याने नागरिकांनी द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’चे आभार मानले आहेत.

द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’ची बातमी म्हणजे इम्पॅक्ट ची हमी!
द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’मधून बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर त्याची वरिष्ठ पातळीवर तातडीने दखल घेतलीच जाते. विनाकारण अवास्तव मांडणी न करता वस्तूनिष्ठ व परिस्थिनुसार बातमी हे द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’चे वैशिष्ट्य असल्याने सर्व शासकीय विभाग त्याकडे सकारात्मक दृष्टिकोन ठेवून पाहतात व आवश्यक उपाययोजना करतात. त्यामुळे द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’हे सर्व स्तरांतील नागरिकांना आपल्या लहानमोठ्या समस्या मांडण्यासाठी हक्काचे व्यासपीठ बनले आहे. दररोज लाखोंच्या संख्येने जोडले जाणारे वाचक ही द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस च्या गुणवत्तापूर्ण कामाची पोचपावती आहे.