
हवेली पोलीस स्टेशन हद्दीत खुलेआम अवैध धंदे; ‘आका’ म्हणतो माझी सेटींग, बिनधास्त चालू द्या
पुणे: पुणे ग्रामीण पोलीस कार्यक्षेत्रातील हवेली पोलीस स्टेशन हद्दीत खुलेआम सर्व अवैध धंदे सुरू आहेत. पोलीस प्रशासनातील या अवैध धंदेवाल्यांचा ‘आका‘ त्यांना अभय देत असून आपली वरपर्यंत सेटींग आहे त्यामुळे कोणी काही करत नाही बिनधास्त चालूद्या असा अप्रत्यक्ष मेसेज तो आका देत आहे.
हवेली पोलीस स्टेशन हद्दीत गांजा, गावाठी दारू, ताडी, मटका, जुगार, गुटखा विक्री व इतर अवैध धंदे खुलेआम सुरू आहेत. राजरोसपणे सर्व अवैध धंदे सुरू असल्याने नागरिकांमध्ये चर्चा सुरू असून वरिष्ठ अधिकाऱ्यांचा पाठींबा आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
अवैध धंदे वाल्यांकडून ‘तो चालक’ मुंडक्यावर बसून हप्ता वसूली करत आहे. दर महिन्याच्या दहा तारखेला हा चालक वसूलीसाठी जातो. वेळेवर म्हणजे वेळेवर हप्ता गोळा केला जातो. ज्याच्याकडून वेळेत हप्ता दिला जात नाही त्याला हा चालक शिवीगाळ करतो. दरम्यान एवढं राजरोसपणे सर्वकाही सुरू असताना वरिष्ठ अधिकारी का लक्ष देत नाहीत? याबाबत कारवाई का केली जात नाही? जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे का? कोणाचा दबाव आहे का? आका सर्व काही मॅनेज करत आहे का? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.