
नांदेड सिटीत दरवर्षीप्रमाणे पर्यावरण पूरक मकरसंक्रांत उत्साहात साजरी
नांदेड सिटीत दरवर्षीप्रमाणे पर्यावरण पूरक मकरसंक्रांत उत्साहात साजरी
नांदेड: नांदेड सिटी येथील श्री स्वामी समर्थ महाराज आणि श्री महावतार बाबाजी मठ येथे पर्यावरण पूरक मकर संक्रांत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली . यावेळी ॲड नरसिंग संभाजीराव लगड , मठाच्या विश्वस्त रागिणी लगड यांच्या वतीने तुळस, गवती चहा, कढीपत्ता, कोरपड अशा दैनंदिन उपयोगी पडणाऱ्या औषधी वनस्पतीचे वाटप नांदेड सिटीतील सुमारे दोन हजार पेक्षा जास्त महिला भगिनींना करण्यात आले.
यावेळी संगीता लगड, धनश्री लगड, सुवर्णा लगड, शांताबाई कोकरे, संध्या पिंजन, दीपिका निरूने यांनी उत्साहात सर्व औषधी वनस्पतींचे वाटप केले. नांदेड सिटीतील महिला स्वयंसेवकांनी दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मोठ्या संख्येने रात्री दहा वाजेपर्यंत उत्साहात संक्रांतीचा उत्सव साजरा केला. सर्व धार्मिक सणसमारंभ पर्यावरणपूरक पद्धतीने साजरे करत या मठाने आपले वेगळेपण जपले आहे.