
मकरसंक्रांतीनिमित्त महिलांना साडी वाटप; सिंहगड फाऊंडेशनचा उपक्रम
मकरसंक्रांतीनिमित्त महिलांना साडी वाटप; सिंहगड फाऊंडेशनचा उपक्रम
खडकवासला: सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या सिंहगड फाऊंडेशनच्या वतीने खडकवासला, कोल्हेवाडी, शिवनगर, किरकटवाडी व परिसरातील महिलांना साडी व इतर वस्तूंचे वाटप करण्यात आले. मकरसंक्रांतीनिमित्त या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य विलास मते, कुणाल कैलास मते, लता विलास मते, माधवी मोरे, दिनेश मते, अमित काळभोर आदी उपस्थित होते.
