♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

तरुणास अमानूष मारहाण व हत्या प्रकरणातील आरोपी नऱ्हे गावचा माजी उपसरपंच सुशांत कुटे याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला; भाजपा पदाधिकारी असलेला आरोपी सुमारे दीड महिन्यापासून फरार

तरुणास अमानूष मारहाण व हत्या प्रकरणातील आरोपी नऱ्हे गावचा माजी उपसरपंच सुशांत कुटे याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला; भाजपा पदाधिकारी असलेला आरोपी सुमारे दीड महिन्यापासून फरार

 

पुणे: पेट्रोल चोरीच्या संशयातून सिंहगड रस्त्याजवळील नऱ्हे येथे 25 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळच्या सुमारास सार्थक नेताजी भगत ( वय 20) या तरुणास अमानूष मारहाण करून आरोपींनी त्याचे व्हिडिओ मोबाईल मध्ये काढले होते. जखमी तरुणाला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र दुर्दैवाने उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी इतर आरोपींना अटक करण्यात आलेली आहे मात्र भाजपा पदाधिकारी व नऱ्हे गावचा माजी उपसरपंच सुशांत कुटे गुन्हा दाखल झाल्यापासून फरार आहे.

सुरुवातीला आरोपीने आपली राजकीय ताकद वापरुन गुन्हा दडपण्यासाठी प्रयत्न केला होता. मात्र याप्रकरणी मनसेचे पदाधिकारी शिवाजी मते, विजय मते व इतरांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन कोणाला वाचविण्याचा प्रयत्न झाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. थेट पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्यापर्यंत हे प्रकरण पोचल्यानंतर त्यांनी तातडीने सर्व आरोपींवर गुन्हा दाखल करुन कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले.

दरम्यान तेव्हापासून आरोपी सुशांत कुटे फरार आहे. त्याच्याकडून पुणे सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल करण्यात आला होता मात्र न्यायाधीश पी.पी. जाधव यांनी तो फेटाळला आहे. सरकारी वकील प्रमोद बोंबटकर व फिर्यादींनी दिलेले वकील अभिजीत टिकर, उत्तम ढवळे यांनी या जामीन अर्जाला कडाडून विरोध केला होता.

 

आरोपीला अटक होत नसल्याने तपासावर प्रश्नचिन्ह 

तब्बल दिड महिना उलटला तरी अद्याप सिंहगड रोड पोलीसांना आरोपी सुशांत कुटे सापडलेला नाही. त्याला वाचविण्याचा प्रयत्न होतोय का असा प्रश्न मनसे पदाधिकारी शिवाजी मते यांनी उपस्थित केला आहे. अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्याने आता पोलीस काय कारवाई करतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

 

शोध पथकातील त्या अधिकाऱ्याचे काय?

ही घटना घडल्यानंतर पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सिंहगड रोड पोलिस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांची तडकाफडकी बदली केली. मात्र शोध पथकातील एका अधिकाऱ्याकडे याप्रकरणी मदत करण्यासाठी ‘डील’ ठरल्याची चर्चा होती. त्याबाबत मात्र पुढे काय कारवाई झाली याबाबत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

Sorry, there are no polls available at the moment.

Related Articles