♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

Fire Reason:’त्यांची’ झाली क्षणाची मस्ती मात्र युवा व्यावसायिकाचे आयुष्य झाले उद्धवस्त; खडकवासला येथील आगीत चाळीस ते पन्नास लाखांचे नुकसान; कष्टाने उभारलेल्या साहित्याची राखरांगोळी

Fire Reason:’त्यांची’ झाली क्षणाची मस्ती मात्र युवा व्यावसायिकाचे आयुष्य झाले उद्धवस्त; खडकवासला येथील आगीत चाळीस ते पन्नास लाखांचे नुकसान; कष्टाने उभारलेल्या साहित्याची राखरांगोळी

 

खडकवासला: खडकवासला येथील बाह्यवळण रस्त्यावरील उमेश मंडप डेकोरेटर्स या दुकानाच्या गोडाऊनला मध्यरात्री लागलेल्या आगीत तब्बल चाळीस ते पन्नास लाख रुपयांचे साहित्य जळून खाक झाले आहे. सर्वसामान्य कुटुंबातील उमेश गोऱ्हे या तरुणाने कष्टाने हळूहळू उभा केलेल्या व्यवसायाची काही तासांत राखरांगोळी झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून पाहण्यासाठी येणारांचे डोळे पाणावत आहेत. ही आग कशी लागली याबाबत धक्कादायक माहिती समोर येत असून सीसीटीव्ही फुटेज मधून काही संशयित तरुण दिसून आले आहेत.

मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास दोन दुचाकीवरून अंदाजे पाच तरुण आल्याचे व उमेश पंडप डेकोरेटर्स या दुकानाच्या पुढच्या बाजूला थांबल्याचे दिसत आहेत. त्यांनी मल्टी स्काय शॉट हा फटाक्याचा बॉक्स सोबत आणल्याचे दिसत आहे. तरुण तो बॉक्स रस्त्यावर ठेऊन पेटवतात. फटाके वाजत असताना एक तरुण त्या बॉक्सला लाथ मारतो त्यामुळे बॉक्स आडवा पडतो व फटाके उमेश पंडप डेकोरेटर्स या दुकानाच्या गोडाऊनमध्ये शिरतात.

तरुण दुचाकीवर बसून थोडे पुढे जातात व पुन्हा मागे येऊन आग विझविण्याचा प्रयत्न करतात परंतु आग आटोक्यात येत नसल्याने ते पळून जातात. आजूबाजूच्या नागरिकांच्या आग लागल्याचे लक्षात आल्यानंतर गर्दी जमा होते. पाणी फील्टर प्लॅंट, जार, कुलर, पंखे, गाद्या, सोफे, खुर्च्या, टेबल, महागडे कापड, भांडी, स्टेजचे साहित्य व इतर वस्तू असा तब्बल चाळीस ते पन्नास लाखांचा मुद्देमाल आगीच्या भक्ष्यस्थानी पडला होता.

खडकवासला गावचे माजी सरपंच सौरभ मते यांनी ‘द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’ शी संपर्क साधून माहिती दिल्यानंतर तातडीने पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या नांदेड सिटी अग्निशमन केंद्राला कळविण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली मात्र तोपर्यंत उमेश गोऱ्हे या तरुण व्यावसायिकाच्या स्वप्नांची राखरांगोळी झाली होती. तरुणांची क्षणाची मस्ती गोऱ्हे कुटुंबासह परिसरातील नागरिकांच्या काळजाचा ठोका चुकवून गेली. या तरुणांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.

 

‘ते तरुण’ आले होते ‘तिच्या’ वाढदिवसामुळे?

मिळालेल्या माहितीनुसार उमेश पंडप डेकोरेटर्स या दुकानाच्या परिसरात राहणाऱ्या एका मुलीचा वाढदिवस होता. तिला दाखविण्यासाठी व शोबाजी करण्यासाठी हे ‘रोमिओ’ फटाक्यांचा बॉक्स घेऊन तिच्या घराच्या परिसरात आले होते. त्यांचे हे सेलिब्रेशन तरुण व्यावसायिकाचे आयुष्य उद्ध्वस्त करून गेले.

 

काही तासांपूर्वी लावले होते सीसीटीव्ही म्हणून कळले!

उमेश पंडप डेकोरेटर्स या दुकानाच्या पुढच्या बाजूला बालाजी वेफर्स डिस्ट्रीब्युटर चे गोडाऊन आहे. त्यांनी कालच सायंकाळी सहा वाजता सीसीटीव्ही कॅमेरे बसवून सुरू केले होते. त्या कॅमेऱ्यांमध्ये ही सर्व घटना कैद झाल्याने आगीचे कारण समोर आले आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

Sorry, there are no polls available at the moment.

Related Articles