120 दिव्यांग बांधवांना इलेक्ट्रीक सायकल वाटप; जागतिक दिव्यांग दिनानिमित्त जुन्नर येथील डिसेंट फाऊंडेशन आणि ओएनजीसी च्या संयुक्त विद्यमाने उपक्रम; सर्व स्तरांतून उपक्रमाचे कौतुक
120 दिव्यांग बांधवांना इलेक्ट्रीक सायकल वाटप; जागतिक दिव्यांग दिनानिमित्त जुन्नर येथील डिसेंट फाऊंडेशन आणि ओएनजीसी च्या संयुक्त विद्यमाने उपक्रम; सर्व स्तरांतून उपक्रमाचे कौतुक
(तालुका प्रतिनिधी -जुन्नर): सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या जुन्नर येथील डिसेंट फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून व ऑइल अँड नॅचरल गॅस कार्पोरेशन लि.(ONGC) च्या सी. एस. आर. फंडाच्या सहकार्यातून जागतिक दिव्यांग दिनानिमित्त 120 दिव्यांगांना तीन चाकी इलेक्ट्रिक सायकल वाटप , त्याचबरोबर दिव्यांग प्रेरणा पुरस्कार 2024 चे वितरण, दिव्यांग बांधवांना UDID कार्ड वाटप, दिव्यांग पूर्व तपासणी नोंदणी व साहित्य वाटप, अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शिवभूमीतील पिंपळगाव सिद्धनाथ येथील श्री समर्थ मंगल कार्यालयात आयोजित कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. चेतनानंद उर्फ पंकज महाराज उपस्थित होते.
दिव्यांग बांधवांना मार्गदर्शन करताना महाराज म्हणाले की दिवसेंदिवस दिव्यांगांची संख्या वाढत चालली आहे. त्यामध्ये जन्मजात, अपघात, आरोग्याची काळजी न घेणे यामुळेच वाढ होत आहे. शारीरिक व आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या व्यक्तींनी दिव्यांगांमध्ये सहानुभूती, आपलेपणा निर्माण करून विश्वास देऊन मानसिक दृष्ट्या सक्षम करावे. डिसेंट फाऊंडेशनचे हे सामाजिक कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे.
याप्रसंगी विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर म्हणाले बांधवांनो, आपल्या नशिबाला दोष न देता अपंगत्वावर मात करा, संघर्ष व दुःख सहन करून अनेक व्यक्तींनी आपले जीवन यशस्वी केले आहे. आपण निराश न होता ज्या क्षेत्रात आपणास आवड आहे ते स्वीकारा. यश मिळवा, निश्चित समाज आपल्याबरोबर असेल.
या कार्यक्रमास डॉ. चेतनानंद उर्फ पंकज महाराज यांच्यासह प्रमुख उपस्थितीत विघ्नहर साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन देवदत्त निकम, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विठ्ठल भोईर, आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी कुळमेथे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष शरदराव लेंडे, माऊली खंडागळे,मोहित ढमाले, अंकुश आमले, गुलाबराव पारखे, तुषार थोरात, दिव्यांग कक्ष अधिकारी संभाजी भांगरे, दिव्यांग वित्त विकास महामंडळाच्या निरीक्षक सविता मोरे, न्यू व्हिजन महाविद्यालयाच्या संस्थापिका जाई खामकर, डिसेंट फाऊंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई,अध्यक्ष महेंद्र बिडवई, उपाध्यक्ष योगेश धर्मे, सेक्रेटरी डॉ. फकीर आतार, संचालक आदिनाथ चव्हाण, संतोष यादव, जुन्नर तालुका ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष प्रा. एकनाथ डोंगरे, रोटरी क्लब ऑफ जुन्नर शिवनेरीचे अध्यक्ष सुनील जाधव,राधेश्याम दिव्यांग संस्थेचे अध्यक्ष दीपक चव्हाण, दिव्यांग पुणे जिल्हा सेलचे अध्यक्षा पुष्पा गोसावी, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब खिलारी, लेण्याद्री देवस्थानचे माजी अध्यक्ष जयवंत डोके, काशिनाथ लोखंडे, शिरीष डुंबरे दीपक कोकणे, गणेश मेहेर, पांडुरंग तोडकर, नितीन कोल्हे, प्रवीण शेळके, संतोष खंडागळे अति मान्यवर दिव्यांग बंधू-भगिनी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थापक जितेंद्र बिडवई,तर सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक लक्ष्मण दातखिळे व आभार सेक्रेटरी डॉ. फकीर आतार यांनी व्यक्त केले.