♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

Khadakwasla Assembly:’कमळ’ की ‘तुतारी’? रेल्वे इंजिन कोणाची धाकधूक वाढविणार? काय सांगतेय खडकवासला विधानसभा मतदारसंघातील आकडेवारी? ‘द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’चे Exclusive विश्लेषण

‘कमळ’ की ‘तुतारी’? रेल्वे इंजिन कोणाची धाकधूक वाढविणार? काय सांगतेय खडकवासला विधानसभा मतदारसंघातील आकडेवारी? ‘द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’चे Exclusive विश्लेषण

(निलेश बोरुडे: संपादक -द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस)

सिंहगड: खडकवासला विधानसभा मतदारसंघातील ‘तिरंगी’ लढत या विधानसभा निवडणुकीत चर्चेचा विषय ठरली आहे. भाजपाचे विद्यमान आमदार भिमराव तापकीर, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी नगरसेवक सचिन दोडके आणि माजी आमदार कै.रमेश वांजळे यांचे पुत्र आणि मनसेचे उमेदवार मयुरेश वांजळे या तिघांनीही सर्वस्व झोकून प्रचार करत वातावरण ढवळून काढले. यावेळी खडकवासला विधानसभा मतदारसंघात 56.53% मतदान झाले असून आता लक्ष लागले आहे ते निकालाकडे.

2019 ची आकडेवारी काय सांगते?
2019 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत आमदार भिमराव तापकीर यांना 1,20,518 मते मिळाली होती. राष्ट्रवादीचे उमेदवार सचिन दोडके यांना 1,17,923 मते मिळाली होती. आमदार भिमराव तापकीर यांचा अवघ्या 2,595 मतांनी विजयी झाला होता. आमदार भिमराव तापकीर यांच्या विजयात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आप्पासाहेब आखाडे(5931 मते) आणि नोटा(3561 मते) यांचा मोठा वाटा असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट दिसत होते.

यावेळी ‘रेल्वे इंजिन’ कुणाच्या स्वप्नांचा धूर करणार?
मनसेचे उमेदवार मयुरेश वांजळे यांनी मागील दोन ते तीन महिन्यांपासून परिसर पिंजून काढला. भिमराव तापकीर व सचिन दोडके यांच्याशी तुलना केली तर सर्वांत जास्त धावपळ मयुरेश वांजळे यांनी केली. जिथे प्रचार संपेल तिथे मुक्काम करून मयुरेश वांजळे यांनी ग्रामीण पट्टयात भावनिक साद घातली. त्याचा फायदा मयुरेश वांजळे यांना होणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील राष्ट्रवादीचे मतदान मयुरेश वांजळे यांच्या पारड्यात पडणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. परंतु मतदार संघाचे ग्रामीण आणि शहरी असे विश्लेषण केले असता तब्बल 85% मतदान शहरी भागात आहे तर केवळ 15% मतदान ग्रामीण भागात आहे. शहरी भागात मयुरेश वांजळे किती प्रभावी ठरतात आणि ते कुणाच्या मतांचे विभाजन करतात त्यावर खडकवासला विधानसभा मतदारसंघातील निकाल अवलंबून असणार आहे. एकंदरीत मयुरेश वांजळे निवडून आले तरी किंवा पराभूत झाले तरी निकालाच्या ‘केंद्रस्थानी’ तेच असणार असल्याचे बोलले जात आहे.

खडकवासला मतदारसंघ ‘पक्ष’ सापेक्ष!
मागील तीन विधानसभा आणि तीन लोकसभा निवडणुकांचा निकाल पाहिला तर खडकवासला विधानसभा मतदारसंघ हा व्यक्ती नाही तर ‘पक्ष सापेक्ष’ असल्याचे दिसून येते. लोकसभेत खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात निवडणूक लढलेले महादेव जानकर, कांचन कुल आणि सुनेत्रा पवार या तिन्ही नवख्या उमेदवारांना खडकवासला विधानसभेतून मताधिक्य मिळालेले आहे. तसेच आमदार भिमराव तापकीर मागील तीन निवडणूकांमध्ये निवडून येत आहेत. त्यामुळे खडकवासला विधानसभा मतदारसंघ हा ‘भारतीय जनता पक्ष’ सापेक्ष असल्याचे दिसून येत आहे. या मतदारसंघात उमेदवार नाही तर पक्ष पाहून मतदान होत असल्याचे स्पष्ट चित्र आहे.

सचिन दोडके भाजपाचा गड भेदणार का?
भारतीय जनता पक्षाचा पारंपरिक गड असलेला खडकवासला विधानसभा मतदारसंघ 2019 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार सचिन दोडके यांनी जवळपास भेदला होता. वंचित बहुजन आघाडी आणि ‘नोटा’ ने भारतीय जनता पक्षाचा गड राखला. यावेळी मागील अनुभवाचा विचार करुन सचिन दोडके यांनी जोरदार प्रचार केला आहे. मागील वेळी कमी पडलेली मते सचिन दोडके मिळवितात का? की पुन्हा मतविभाजनाचा फटका बसतोय? याचे उत्तर शनिवारी मिळणार आहे!

भिमराव तापकीर ‘चौकार’ मारणार?
पहिल्या यादीत नाव नसल्याने भारतीय जनता पक्ष यावेळी उमेदवार बदलणार असल्याच्या चर्चेने जोर धरला होता. सलग तीन वेळा निवडून येऊन पहिल्या यादीत नाव न आल्याने पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यामध्ये नाराजी पसरली होती. काही नगरसेवकांनी आमदार भिमराव तापकीर यांच्या विरोधात जाहिर भूमिका घेतली होती. तर आयात उमेदवाराचा प्रचार करणार नाही अशी भूमिका भारतीय जनता पक्षाच्या निष्ठावान पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घेतली होती. शेवटच्या काही दिवसांमध्ये आमदार भिमराव तापकीर यांनी सुत्रे हलवून तिकीट खेचून आणले. उमेदवारी जाहिर होण्यापूर्वी सुरू असलेल्या सर्व नकारात्मक चर्चा मागे टाकून आमदार भिमराव तापकीर यावेळीही निवडून येऊन विजयाचा चौकार मारणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. अर्थात त्यासाठी येत्या शनिवारच्या निकालाची प्रतिक्षा करावी लागणार आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

Sorry, there are no polls available at the moment.

Related Articles