♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

kidnapped & murder: अपहरण झालेल्या व्यावसायिक विठ्ठल पोळेकर यांचा निर्घृण खून; ओसाडे गावच्या हद्दीत आढळला छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह; सिंहगड परिसरात खळबळ 

kidnapped & murder: अपहरण झालेल्या व्यावसायिक विठ्ठल पोळेकर यांचा निर्घृण खून; ओसाडे गावच्या हद्दीत आढळला छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह; सिंहगड परिसरात खळबळ 

 

सिंहगड: सिंहगड पायथ्यापासून अपहरण झालेल्या नामांकित व्यावसायिक विठ्ठल पोळेकर(वय अंदाजे 70) यांचा निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली असून ओसाडे(ता. वेल्हे) गावच्या हद्दीत त्यांचा छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह आढळून आला आहे. या घटनेमुळे सिंहगड परिसरात खळबळ उडाली असून हवेली पोलीस स्टेशन हद्दीतील कायदा सुव्यवस्थेची लक्तरे सातत्याने वेशीवर टांगली जात असल्याचे विदारक चित्र दिसत आहे. दरम्यान विधानसभा निवडणुकीचे मतदान अवघ्या दिवसांवर आलेले आलेले असताना सातत्याने घडत असलेल्या गुन्हेगारी घटनांमुळे हवेली पोलीस स्टेशन हद्दीत दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दि 14 नोव्हेंबर रोजी विठ्ठल पोळेकर हे नियमित मॉर्निंग वॉक करण्यासाठी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास सिंहगड पायथ्याकडे गेले होते. दररोज लवकर घरी परत येणारे पोळेकर सकाळी दहा वाजून गेले तरी परत न आल्याने नातेवाईकांनी शोधाशोध सुरू केली परंतु ते आढळून आले नाहीत. काही दिवसांपूर्वी पोळेकर यांना खंडणीसाठी धमकी देण्यात आलेली असल्याने घरातील सदस्यांनी अपहरणाची शक्यता लक्षात घेऊन हवेली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. तेव्हापासून हवेली पोलीस, स्थानिक गुन्हे शाखा व पुणे ग्रामीण च्या वेगवेगळ्या पोलीस स्टेशन मधील पथके याबाबत तपास करण्यासाठी तैनात करण्यात आलेली होती.

दरम्यान आज सायंकाळच्या सुमारास विठ्ठल पोळेकर यांचा अत्यंत छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह ओसाडे गावच्या हद्दीत आढळून आला आहे. पोळेकर यांचा अत्यंत निर्घृणपणे खून करण्यात आल्याचे बोलले जात असून कुटुंबातील सदस्य, नातेवाईक व परिसरातील नागरिकांना धक्का बसला आहे. पुणे ग्रामीण पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी उपस्थित असून डोणजे, गोळेवाडी, आतकरवाडी व परिसरात तणावपूर्ण शांतता पसरली आहे.

 

पोलीस निरीक्षकांना शौर्य पदक द्यावे!

निवडणूक आचारसंहिता लागलेली असताना हवेली पोलीस स्टेशन हद्दीत अत्यंत गंभीर गुन्हेगारी घटना घडत आहेत. कायदा सुव्यवस्थेला हरताळ फासला जात आहे. अवैध धंदेवाले हैदोस घालत आहेत. असे असताना जबाबदार असलेल्या पोलीस निरीक्षकांवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. आता तर थेट अपहरण आणि हत्येची घटना घडली आहे. त्यामुळे पोलीस खात्याच्या आब्रुचे धिंडवडे काढल्याबद्दल हवेलीच्या पोलीस निरीक्षकांना शौर्य पदक देऊन सन्मानित करण्यात यावे अशी संतप्त भावना नागरिक व्यक्त करत आहेत.

 

ती सेटलमेंट कोणी केली? 

सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बाचाबाची आणि धमकी दिल्याबाबत तक्रार दाखल करण्यासाठी पोळेकर कुटुंबातील काही सदस्य हवेली पोलीस ठाण्यात गेले होते. त्यावेळी पोलीस अधिकारी व काही अधिकाऱ्यांनी सेटलमेंट करुन पोळेकर यांची समजूत घातल्याची चर्चा आहे. त्या दिवशीचे पोलीस स्टेशन मधील सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध आहे. त्यामुळे जर त्यावेळी गुन्हा दाखल करुन आवश्यक प्रतिबंधक कारवाई हवेली पोलीसांनी केली असती तर कदाचित हा गंभीर गुन्हा घडला नसता. परंतु दुर्दैवाने ती ‘सेटलमेंट’ पोळेकर यांच्या जीववर बेतली आहे. त्यामुळे ते सीसीटीव्ही फुटेज चेक करुन जबाबदार पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांना पोलीस सेवेतून कायमचे बडतर्फ करण्याची तसदी पोलीस अधीक्षकांनी घेणे आवश्यक आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

Sorry, there are no polls available at the moment.

Related Articles