♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

मॉर्निंग वॉक साठी गेलेल्या व्यावसायिकाचे अपहरण; सिंहगडाच्या पायथ्याशी घडलेल्या घटनेने परिसरात खळबळ; हवेली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; दुसरा दिवस उजाडला तरी शोध नाही 

मॉर्निंग वॉक साठी गेलेल्या व्यावसायिकाचे अपहरण; सिंहगडाच्या पायथ्याशी घडलेल्या घटनेने परिसरात खळबळ; हवेली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; दुसरा दिवस उजाडला तरी शोध नाही

 

सिंहगड: सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या गोळेवाडी- आतकरवाडी रस्त्यावरून काल दि. 14 नोव्हेंबर रोजी पहाटे साडेपाच ते सहा वाजण्याच्या सुमारास मॉर्निंग वॉक साठी गेलेल्या व्यावसायिकाचे अज्ञातांनी अपहरण केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून परिसरात खळबळ उडाली आहे. विठ्ठल पोळेकर (वय अंदाजे 65) असे अपहरण झालेल्या व्यावसायिकाचे नाव असून या घटनेमुळे हवेली पोलीस स्टेशन हद्दीतील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

व्यावसायिक विठ्ठल पोळेकर हे काल पहाटे नियमित प्रमाणे मॉर्निंग वॉक साठी घराबाहेर पडले. ते दररोज सिंहगडाच्या पायथ्यापर्यंत किंवा कधीकधी वरपर्यंत चालत जातात. सकाळी दहा वाजून गेले तरी ते परत न आल्याने नातेवाईकांनी शोधाशोध सुरु केली परंतु पोळेकर आढळून आले नाहीत.

विठ्ठल पोळेकर यांचे अपहरण झाल्याची शक्यता लक्षात घेऊन नातेवाईकांनी याबाबत हवेली पोलीसांना माहिती दिली. हवेली पोलीस, पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा याबाबत तपास करत असून दुसरा दिवस संपत आलाय तरी अद्याप काहीच धागेदोरे हाती लागले नाहीत. दरम्यान अचानक घडलेल्या या घटनेमुळे पोळेकर कुटुंबाला धक्का बसला असून नातेवाईक आक्रोश करत आहेत.

 

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सातत्याने गुन्हेगारी घटना 

हवेली पोलीस स्टेशन हद्दीत विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागलेली असताना सातत्याने गुन्हेगारी घटना घडत आहेत. राजरोसपणे अवैध धंदे सुरू आहेत. याबाबत पोलीस अधीक्षकांना सर्वकाही दिसत असताना जबाबदार असलेल्या पोलीस निरीक्षकांवर त्यांनी अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही. एका बाजूला भयमुक्त वातावरणात निवडणुका पार पाडण्यासाठी निवडणूक आयोग प्रयत्न करत असताना हवेली पोलीस स्टेशन हद्दीत मात्र वेगळे चित्र दिसत आहे. निवडणूक आयोगानेही याबाबत गांभीर्याने दखल घेऊन कारवाई करणे आवश्यक आहे.

 

अजून कशाची वाट पाहिली जात आहे?

पोलीस निरीक्षकांचे अभय असल्याने हद्दीत अवैध धंदे फोफावले असून त्यातून सातत्याने मोठमोठ्या गुन्हेगारी घटना घडत आहेत. कारवाईत दिरंगाई होत असल्याने वरिष्ठ अधिकारी कशाची वाट पाहत आहेत असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक उपस्थित करत आहेत.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

Sorry, there are no polls available at the moment.

Related Articles