कत्तलीसाठी जनावरे चोरणारी टोळी रंगेहाथ पकडली; पतितपावन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून हवेली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
कत्तलीसाठी जनावरे चोरणारी टोळी रंगेहाथ पकडली; पतितपावन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून हवेली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
सिंहगड रोड: सिंहगड रस्त्यावरील नांदेड सिटी सर्कल जवळ पतितपावन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व काही स्थानिक नागरिकांनी पाठलाग करुन एका छोट्याशा बंदीस्त टेंपोत चोरुन कत्तलीसाठी चालवलेल्या गायीसह संशयितांना रंगेहाथ पकडले आहे. पतितपावन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संबंधित चोरांच्या विरोधात हवेली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुपारी तीन ते चार वाजण्याच्या सुमारास नांदेड-शिवणे पुलाजवळ बंदिस्त टेंपोत कत्तलीसाठी गाय चोरुन नेण्यात येत असल्याची माहिती पतित पावन संघटना खडकवासला विधानसभा अध्यक्ष सौरभ कुलकर्णी, आशिष बेनकर, गणेश साखरे, बापू वाल्हेकर, शिवा पानेकर, अभिषेक लोणारे, वैभव मानकर, तन्मय पोळ, गणेश शिंदे, लाला तणपुरे, अमोल गोडांबे यांना मिळाल्यानंतर पाठलाग करुन नांदेड सिटी सर्कल जवळ सदर टेंपो पकठण्यात आला. यावेळी अक्षय देडगे व इतर काही स्थानिक नागरिक गोळा झाले होते.
सुरुवातीला टेंपो चालक उडवाउडवीची उत्तरे देत होता मात्र नागरिकांनी टेंपोचा मागचा दरवाजा उघडण्यास सांगितल्यानंतर तो गडबडला. अत्यंत लहान टेंपोत गाय कोंबण्यात आली होती व बाहेरुन दरवाजा बंद होता. दरम्यान सदर चोरटे हे गोमांस विक्री करणारे असल्याची माहिती सांगण्यात येत आहे. याबाबत हवेली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.