अवैध धंद्यांच्या वादातून हवेली पोलीस स्टेशन हद्दीतील सिंहगड रस्त्यावरील जेपी नगर येथे गोळीबार करत 20 ते 25 जणांकडून हातात कोयते घेऊन दहशत माजविण्याचा प्रयत्न? हवेली पोलीसांकडून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा नागरिकांचा आरोप
अवैध धंद्यांच्या वादातून हवेली पोलीस स्टेशन हद्दीतील सिंहगड रस्त्यावरील जेपी नगर येथे गोळीबार करत 20 ते 25 जणांकडून हातात कोयते घेऊन दहशत माजविण्याचा प्रयत्न; हवेली पोलीसांकडून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा नागरिकांचा आरोप
सिंहगड रोड: अवैध धंद्याच्या वादातून सिंहगड रस्त्यावरील जेपी नगर येथील बुध्द विहार परिसरात सुमारे 20 ते 25 गुन्हेगारांच्या टोळक्याने हवेत गोळीबार करत हातात कोयते घेऊन दहशत माजविण्याचा प्रयत्न केला आहे. सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून हवेली पोलीस याबाबत वाच्यता न करण्यासाठी दबाव टाकत असून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
जयप्रकाश नारायण नगर जवळील बुद्ध विहार परिसरात दोघेजण बसलेले असताना सुमारे 20 ते 25 जण हातात कोयते घेऊन तेथे आले. त्यावेळी त्यातील एकाने हवेत दोन गोळ्या फायर केल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत माहिती मिळताच हवेली पोलीस व पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचा मोठा फौजफाटा घटनास्थळी जमा झाला होता. मात्र सदर प्रकरण अवैध धंद्याच्या वादातून घडल्याने पोलीसांचीच आब्रु जाईल म्हणून पोलीसांनी दबाव टाकून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप नागरिकांनी ‘ द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’ शी बोलताना केला आहे.
” हवेली पोलीसांनी येऊन उलट दमबाजी केली. अंधार असल्याने गोळ्यांच्या पुंगळ्या सापडल्या नसतील पण दोन गोळ्या फायर झाल्या आहेत. हातात कोयते घेतलेले पंचवीस पेक्षा जास्त गुंड तेथे आले होते. पोलीस हप्ते घेत असल्याने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत आहेत. परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. त्यात हे गुंड आलेले, गेलेले स्पष्ट दिसून येईल पण पोलीस गुन्हेगारांना सोडून इकडेच दबाव टाकत आहेत’, असा धक्कादायक आरोप नागरिकाने द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस शी बोलताना केला आहे. याबाबत पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक दखल घेतात की नाही ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
वरिष्ठांना खोटी माहिती देण्याचा प्रयत्न?
दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार हवेली पोलीस स्टेशन कडून घटना घडल्यानंतर प्रकरण दडपण्याचा प्रयत्न तर झालाच परंतु असं काही घडलंच नाही असं सांगून वरिष्ठांची दिशाभूल करण्यात आली असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने कारवाई करणे आवश्यक आहे.