♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

तु मला आवडतेस…. केबिनमध्ये चल; वासनांध पालिका अधिकाऱ्याचे महिला कर्मचाऱ्याशी अश्लील वर्तन; सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयातील वरिष्ठ आरोग्य निरीक्षकाच्या विरोधात गुन्हा दाखल 

  1. तु मला आवडतेस…. केबिनमध्ये चल; वासनांध पालिका अधिकाऱ्याचे महिला कर्मचाऱ्याशी अश्लील वर्तन; सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयातील वरिष्ठ आरोग्य निरीक्षकाच्या विरोधात गुन्हा दाखल 

 

पुणे: ‘ तु मला खुप आवडतेस, माझ्यासोबत बंद केबिनमध्ये चल आपण वैयक्तिक बोलू’ असे म्हणत पुणे महापालिकेच्या सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयातील वासनांध वरिष्ठ आरोग्य निरीक्षकाने सहकारी कर्मचारी महिलेशी अश्लील वर्तन केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यावर सिंहगड रोड पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चंद्रकांत गणपत लाड (वय 55, रा. कर्वेनगर,पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या वरिष्ठ आरोग्य निरीक्षकाचे नाव आहे.

दि. 30 सप्टेंबर रोजी महिला कर्मचारी कार्यालयात एकटी असताना चंद्रकांत लाड तिच्याजवळ गेला व केबिनमध्ये येण्यास सांगू लागला. त्यावेळी संबंधित महिलेने केबिनमध्ये जाण्यास नकार दिल्यानंतर,” मी तुला कामात सुट देतो. पाहिजे तेव्हा सुट्टी देतो. त्यामुळे तू माझे एक काम कर, केबिनमध्ये चल,” असे चंद्रकांत लाड त्या कर्मचारी महिलेला म्हणाला.

दरम्यान घाबरलेल्या महिलेने ही बाब आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितली. महिलेच्या तक्रारीवरून वरिष्ठ आरोग्य निरीक्षक चंद्रकांत लाड याच्या विरोधात सिंहगड रोड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राघवेंद्र क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुरेश जायभाय याबाबत अधिक तपास करत आहेत. या धक्कादायक प्रकारामुळे सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयात खळबळ उडाली असून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

https://youtube.com/@theinvestigationexpress?si=xWEAdGe3NJkUlmHW

(अन्याय, अत्याचाराच्या विरोधात निर्भीड, सडेतोड व वास्तवदर्शी बातम्या जाणून घेण्यासाठी The Investigation Express या YouTube चॅनला आत्ताच subscribe करा.)

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

बारामती लोकसभा मतदारसंघात कोणाचं पारडं जड राहील?

  • सुप्रिया सुळे (72%, 23 Votes)
  • सुनेत्रा पवार (28%, 9 Votes)

Total Voters: 32

Loading ... Loading ...


Related Articles