♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

प्रस्तावित नांदेड सिटी पोलीस स्टेशन हद्दीत नांदेड किरकटवाडी खडकवासला नांदोशी-सणसनगर या गावांचा समावेश करण्याची मागणी; कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी निर्णय आवश्यक पण त्या मूळ आराखड्यात कोणाच्या सांगण्यावरून बदल?

प्रस्तावित नांदेड सिटी पोलीस स्टेशन हद्दीत नांदेड किरकटवाडी खडकवासला नांदोशी-सणसनगर या गावांचा समावेश करण्याची मागणी; कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी निर्णय आवश्यक पण त्या मूळ आराखड्यात कोणाच्या सांगण्यावरून बदल?

 

खडकवासला: प्रस्तावित नांदेड सिटी पोलीस स्टेशन मध्ये कोणकोणत्या भागांचा समावेश असेला याचा आराखडा नुकताच प्रसिद्ध करण्यात आला आहे मात्र ज्या गावाच्या नावाने हे प्रस्तावित पोलीस स्टेशन होणार आहे त्या गावाचाच त्यात समावेश नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक सचिन दोडके, पदाधिकारी खुशाल करंजावणे, काकासाहेब चव्हाण व नरेंद्र हगवणे यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना निवेदन देऊन ही बाब निदर्शनास आणून दिली. तसेच पालिका हद्दीत समाविष्ट करण्यात आलेल्या नांदेड, किरकटवाडी, खडकवासला व नांदोशी-सणसनगर या गावांचा पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत प्रस्तावित असलेल्या नांदेड सिटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत समावेश करण्याची मागणी केली.

(खासदार सुप्रिया सुळे यांना निवेदन देताना पदाधिकारी)

सन 2021 पासून नांदेड सिटी येथे नवीन पोलीस स्टेशन होणार असल्याची चर्चा आहे. तत्कालीन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी नांदेड सिटी येथे येऊन प्रस्तावित 18 गुंठे जागेची पाहणी देखील केली होती. त्यावेळी या नवीन पोलीस स्टेशन च्या हद्दीत नांदेड, किरकटवाडी खडकवासला व नांदोशी-सणसनगर या गावांचा समावेश करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते.

या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात गुन्हे घडत असल्याने व पुणे ग्रामीण पोलीस अर्थात हवेली पोलीस स्टेशन अपुरे मनुष्यबळ व इतर काही कारणांमुळे अशा घटना रोखण्यात अपयशी ठरत असल्याने नागरिक सातत्याने या गावांचा पुणे शहर पोलीस आयुक्तालयात समावेश करावा अशी मागणी करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी नगरसेवक सचिन दोडके, पदाधिकारी खुशाल करंजावणे, काकासाहेब चव्हाण व किरकटवाडीचे माजी उपसरपंच नरेंद्र हगवणे यांनी खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेऊन याबाबत सविस्तर चर्चा केली व निवेदन दिले. पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे याबाबत पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी दिले.

 

प्रस्तावित नांदेड सिटी पोलीस स्टेशन म्हणजे केवळ सिंहगड रोड पोलिस स्टेशनचे विभाजन!

सध्या जो प्रस्तावित नांदेड सिटी पोलीस स्टेशन चा आराखडा तयार करण्यात आला आहे त्यामध्ये ग्रामीण हद्दीतील कोणताही भाग समाविष्ट नाही. केवळ सिंहगड रोड पोलिस स्टेशनचे विभाजन करुन अभिरुची व नऱ्हे पोलीस चौकी अंतर्गत असलेला भाग या नवीन पोलीस स्टेशनमध्ये दाखविण्यात आला आहे. सुरुवातीला जो आराखडा तयार करण्यात आला होता त्या हद्दीच्या नकाशात या नवीन पोलीस स्टेशन हद्दीत नांदेड, किरकटवाडी खडकवासला व नांदोशी-सणसनगर या पूर्ण महसुली गावांची हद्द दाखविण्यात आली होती. असे असताना प्रत्यक्षात मात्र ही चार गावे वगळण्यात आली आहेत. कोणाच्या सांगण्यावरून ही गावे वगळण्यात आली याबाबत खुलासा होणे आवश्यक आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

बारामती लोकसभा मतदारसंघात कोणाचं पारडं जड राहील?

  • सुप्रिया सुळे (72%, 23 Votes)
  • सुनेत्रा पवार (28%, 9 Votes)

Total Voters: 32

Loading ... Loading ...


Related Articles