♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

Impact News: संशयित ड्रोनची उत्तमनगर पोलीसांनी घेतली गंभीर दखल; हद्दीतील गावांतील सरपंच, पोलीस पाटील व इतर पदाधिकाऱ्यांची घेतली तातडीने बैठक; तपास सुरू, नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना पण ड्रोनच्या घिरट्या थांबेनात!

Impact News: संशयित ड्रोनची उत्तमनगर पोलीसांनी घेतली गंभीर दखल; हद्दीतील गावांतील सरपंच, पोलीस पाटील व इतर पदाधिकाऱ्यांची घेतली तातडीने बैठक; तपास सुरू, नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना पण ड्रोनच्या घिरट्या थांबेनात!

 

खडकवासला: अतिसंवेदनशील असलेल्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी(एनडीए)व खडकवासला धरणालगत कुडजे, खडकवाडी व परिसरात मध्यरात्री तीन संशयित ड्रोन आकाशात घिरट्या घालत असल्याचे ‘द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’ ने निदर्शनास आणून दिल्यानंतर पुणे शहर पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याची गांभीर्याने दखल घेतली असून आज परिसरातील गावांतील पदाधिकारी व नागरिकांची उत्तमनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मोहन खंदारे यांनी बैठक घेऊन सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र काही वेळापूर्वी परिसरात पुन्हा ड्रोन घिरट्या घालत असल्याचे नागरिकांनी कळविल्याने याबाबतचे गुढ अधिक वाढले आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन खंदारे यांनी उत्तमनगर पोलीस स्टेशन हद्दीतील व हद्दीलगत असलेल्या कुडजे, अहिरे, खडकवाडी , मांडवी खुर्द, मांडवी बुद्रुक, सांगरून, बहुली, जांबली, मुठा, कुरण, अगळांबे आणि इतर गावातील सरपंच, पोलीस पाटील, ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्ती अध्यक्ष, माजी सरपंच, विविध मंडळांचे अध्यक्ष, प्रतिष्ठित नागरिक यांची एकत्रित बैठक घेऊन सूचना दिल्या.

 

” परिसरातील गावांतील पदाधिकारी व नागरिकांची बैठक घेऊन संशयास्पद हालचाली आढळून आल्यास तातडीने उत्तमनगर पोलीस स्टेशनमध्ये संपर्क साधण्याच्या सूचना दिल्या आहेत. संबंधित ड्रोन कोण उडवत आहे, त्यामागे काय उद्देश आहे याबाबत गांभीर्याने तपास सुरू आहे.” मोहन खंदारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, उत्तमनगर पोलीस स्टेशन, पुणे शहर.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

बारामती लोकसभा मतदारसंघात कोणाचं पारडं जड राहील?

  • सुप्रिया सुळे (72%, 23 Votes)
  • सुनेत्रा पवार (28%, 9 Votes)

Total Voters: 32

Loading ... Loading ...


Related Articles