♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

सिंहगड रोड परिसरात दिड दिवसाच्या बाप्पाला निरोप;पालिकेने केलेल्या व्यवस्थेला नागरिकांचा प्रतिसाद

सिंहगड रोड: सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत विविध ठिकाणी दिड दिवसाच्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला. पुणे महापालिकेच्या सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाने केलेल्या गणेश मुर्ती विसर्जन व्यवस्थेला परिसरातील नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. संबंधित ठिकाणी निर्माल्य संकलनाचीही व्यवस्था पालिकेच्या वतीने करण्यात आली आहे.

सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत खडकवासला कालवा, खडकवासला धरण व मुठा नदीचा भाग येतो. त्यामुळे यापूर्वी बहुतांश नागरिक पारंपरिक पद्धतीने या जलस्रोतांमध्ये गणेश मूर्ती विसर्जन करत असत. परंतु मागील काही वर्षांपासून गणेश मूर्ती विसर्जनासाठी पालिकेकडून हौदांची व्यवस्था करण्यात येत असल्याने व नागरिकांना सोयीस्कर होईल अशा चौकांमध्ये, रस्त्याला लागून असे हौद ठेवण्यात येत असल्याने गणेशभक्तांची गैरसोय दूर झाली आहे. तसेच या ठिकाणी पालिकेच्या आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी तैनात असल्याने त्यांच्याकडून नागरिकांना आवश्यक सहकार्य करण्यात येत आहे.

(गणेश मुर्ती विसर्जन केल्यानंतर नागरिकांनी नोंदविलेले अभिप्राय)

दिड दिवसाच्या बाप्पाला निरोप दिल्यानंतर नागरिकांनी पालिकेने केलेल्या सुविधेबद्दल समाधान व्यक्त करत अभिप्राय नोंदविले आहेत. सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी नागरिकांना आवश्यक सहकार्य करत असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त नामदेव बजबळकर यांनी ‘द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’शी बोलताना दिली आहे.

 

सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयांतर्गत असलेली व्यवस्था 

•58 विसर्जन ठिकाणे

•78 टाक्या

•37 मूर्ती संकलन केंद्र

•1 घाट

•40 निर्माल्य कंटेनर

•320 अधिकारी व कर्मचारी

“सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत जागोजागी गणेश मुर्ती विसर्जनासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सद्यस्थितीत 1279 गणेश मुर्तींचे विसर्जन झाले आहे. नागरिकांनी यापुढेही या सुविधेचा लाभ घ्यावा. कालवा, धरण किंवा नदीत मुर्ती विसर्जन करु नये. पालिकेचे अधिकारी व कर्मचारी आपल्याला पूर्ण सहकार्य करण्यासाठी उपलब्ध आहेत.” नामदेव बजबळकर, सहाय्यक आयुक्त, सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालय, पुणे मनपा.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

बारामती लोकसभा मतदारसंघात कोणाचं पारडं जड राहील?

  • सुप्रिया सुळे (72%, 23 Votes)
  • सुनेत्रा पवार (28%, 9 Votes)

Total Voters: 32

Loading ... Loading ...


Related Articles