‘साई’sssss मला माफ कर!!!!!…….. मी आत्मपरीक्षण करतो का नाही मिळालं उरळी आणि पौड??
‘साई’sssss मला माफ कर!!!!!…….. मी आत्मपरीक्षण करतो का नाही मिळालं उरळी आणि पौड??
‘साई’ssssssssss….. ये साईsssssssss….. ऐकतोय ना तू! वह्यांची पानं भरवली रे मी ‘साई-साई’ लिहून! किती रात्री जागवल्या तुझा धावा करुन! काय कमी पडलं रे मग माझ्या भक्तीत? गेलं ना रे अगोदर उरुळी आणि आता पौडही! किती स्वप्न रंगवली होती रे मी….. उरुळीचा ‘पहिला’ म्हणून पाटी लागेल. माझं किती ‘वजन’ आहे सगळ्यांना कळेल. ‘माझी पोहोच’ सगळ्यांना दिसेल पण तेव्हा ही माझं ते स्वप्न अधुरं राहिलं! मी तरिही खचलो नाही. आता उरुळी काय पौड घेऊन दाखवायचं सगळ्यांना असं ठरवलं! पुन्हा वह्या भरवल्या, धावा सुरू केला. बरं हे कमी म्हणून की काय मी अनेकांचे ‘पाय धरले’! सगळे माझी खिल्ली उडवायचे तुझी लायकी आहे का पौड करायची असं म्हणून!! मी दक्षिणा द्यायला पण तयार होतो पण कोणी पावलं नाही! अगोदर उरुळी आणि आता पौडही माझ्या डोळ्यादेखत गेलं रे!! लय जीव तुटतोय तुला काय सांगू?
पण आता मी आत्मपरीक्षण करायचं ठरवलं आहे! तू मला सांग खरंच माझी लायकी नाही का रे उरुळी आणि पौड करायची? सगळे म्हणतात मी भामटा आहे. स्वतः च्या फायद्यासाठी दुसऱ्यांचा बळी देतो. स्वतः चांगला आहे असं दाखविण्यासाठी दुसरे किती वाईट आहेत हे दाखवतो. जिथं माझा फायदा आहे तिथं लोंडा घोळतो. खुप कसंतरी तोंड करुन खोटं खोटं हसण्याचा आव आणतो. व्हय साई हे खरं आहे???? सांग ना साईssssssss???…. कारण मला आता असं वाटायला लागलं आहे की लोकं बोलतात तेच खरं आहे! उरुळी आणि आता पौडही गेल्यामुळे माझा लोकांच्या बोलण्यावर विश्वास बसायला लागला आहे की खरंच मीच नालायक आहे!! भक्ती करुन आणि डायऱ्यांच्या पानांवर तुझं नाव लिहून हवं ते मिळत नसतं तर त्यासाठी वागणूक आणि मनही निर्मळ असावं लागतं हे मला पटलं आहे!! माफ कर साईsssssss!!!!!!
(या कथेचा कोणाशीही संबंध नाही. वाचताना कोणाला तसं वाटल्यास तो केवळ योगायोग समजावा.)