♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

शिवसेनेकडून महायुती सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचा कडेलोट; छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेचा सिंहगडावर निषेध 

सिंहगड: सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ल्यावरिल छत्रपती शिवाजी महाराजांचा अवघ्या काही महिन्यांपूर्वी उभारलेला पुतळा कोसळल्याच्या घटनेचा तीव्र निषेध करत याला महायुती सरकार व संबंधित ठेकेदार जबाबदार आहे असे म्हणत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सिंहगडावरील पुणे दरवाजा जवळील बुरुजावरुन महायुती सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचा कडेलोट करण्यात आला. यावेळी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला.

येत्या काळात सरकारच्या गलथान कारभारा विरोधात शिवसेनेकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा उपजिल्हाप्रमुख रवी मुजुमले व संदीप मते यांनी दिला.यावेळी शहरसंघटक संतोष गोपाळ,माजी पं. समिती सदस्य पोपट चोरगे,नाना मरगळे,दीपक खिरीड,विनायक नलावडे,निवृत्ती वाव्हळ,प्रदीप दोडके,आकाश यादव, सागर जावळकर आदी शिवसैनिक उपस्थित होते.

” इतकी मोठी आणि वाईट घटना होऊन देखील त्याच्यावरती अतिशय बालिश पद्धतीने स्टेटमेंट देणाऱ्या राज्य शासनातील बेजबाबदार मंत्र्यांचा निषेध करत महाराष्ट्रातील 14 कोटी जनतेचा अपमान झाल्या प्रकरणी त्याचप्रमाणे छत्रपती शिवरायांचा अवमान झाल्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी किमान माफी मागण्याची दानत दाखवावी.” सचिन पासलकर युवासेना जिल्हाप्रमुख व निवडणुक समन्व्यक

“येणाऱ्या काळात भ्रष्टाचारी सरकारचा जनताच कडेलोट करेल.” बुवा खाटपे जिल्हासंघटक

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

Sorry, there are no polls available at the moment.

Related Articles