♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

लाईट गेल्यावर आपण चिडचिड करतो पण ती परत येते ती सहज येत नाही…!

किरकटवाडी(सिंहगड रोड): काल रात्री नऊ वाजल्यापासून आमचे किरकटवाडी येथील माळवाडी परिसरात असलेल्या टर्फला क्रिकेटसाठी बुकिंग होते. नऊ वाजण्याच्या सुमारास उत्सव आणि अर्बन ग्राम या दोन्ही सोसायट्यांतील आम्ही बारा ते तेरा जण टर्फला आलो पण टर्फ ची लाईट गेलेली होती. सगळी बटणं तपासून पाहिली, मीटर पाहिले पण लाईट येईना. इतर सगळीकडे लाईट होती पण केवळ टर्फ ची लाईट नसल्याने आता दिवस वाया जाणार म्हणून जवळपास अर्धा तास सगळे हताश होऊन इकडेतिकडे पाहत होते.

जवळच माळवाडीच्या कोपऱ्यावर महावितरणचा ट्रान्सफॉर्मर आहे. आमच्यातील एकाचे लक्ष गेले आणि तो म्हटला ‘तिथं एमएससीबीची गाडी दिसतेय!’ आम्ही सगळे पटपट चालत तिकडे गेलो आणि लाईट लागत नसल्याचे त्यांना सांगितले तर तेच पाहायला आलो आहे असे कर्मचाऱ्यांनी सांगितले. आम्हाला खूप आनंद झाला पण आता त्या कर्मचाऱ्यांना फॉल्ट पाहण्यासाठी ज्या परिस्थितीतून जायचं होतं ते पाहून सगळेच शांत झाले. खुप मोठे गवत वाढलेले होते. आजुबाजुला झुडपे होती. पाऊस होऊन गेलेला असल्याने गवतावर पाणी होते. गवत एवढे वाढलेले आहे की एखाद्या वेळी टर्फच्या बाहेर बॉल गेला तर भितीने कोणी पाहायला ही जात नाही. त्या गवतातून या कर्मचाऱ्यांना मात्र जावं लागणार होतं. आम्ही सगळे हे पाहत होतो. हातातील पाईपने गवत सावरत बॅटरी च्या उजेडात दोघे कर्मचारी अगदी जीव मुठीत धरुन ट्रान्सफॉर्मर कडे गेले. रस्त्यावर थांबून आम्ही पाहत होतो पण गवत आणि झुडपांमुळे कर्मचारी आम्हाला दिसतही नव्हते. थोड्याच वेळात लाईट आली परंतु आमच्यातील जेवढे सहकारी महावितरणच्या कर्मचाऱ्यांना कशा परिस्थितीत काम करावे लागते हे पाहत होते सगळे, ‘अवघड आहे’ या पलिकडे काही न म्हणता शांत झाले होते.

लाईट गेल्यावर आपण महावितरणच्या नावाने बोटे मोडत असतो, परंतु तिथं काम करणारीही माणसंच असतात आणि त्यांना किती आव्हानांचा सामना करावा लागतो याचा प्रत्यक्ष अनुभव सगळ्यांना आला. दोन्हीही कर्मचाऱ्यांच्या धाडसाला सलाम!

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

बारामती लोकसभा मतदारसंघात कोणाचं पारडं जड राहील?

  • सुप्रिया सुळे (72%, 23 Votes)
  • सुनेत्रा पवार (28%, 9 Votes)

Total Voters: 32

Loading ... Loading ...


Related Articles