♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

अगोदरच अपुरे कर्मचारी त्यात महाकाय मगर आढळल्याने घबराट; तुडुंब भरलेल्या वरसगाव धरणावरील स्थिती; कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर 

वरसगाव: तब्बल 91.70 टक्के भरलेल्या आणि खडकवासला धरण साखळीतील सर्वात मोठे धरण असलेल्या वरसगाव धरणाच्या थेट भिंतीवर काल मध्यरात्री महाकाय मगर आढळून आल्याने कर्मचारी भयभीत झाले आहेत. मगर आढळल्याने प्रतिकूल परिस्थितीत काम करणारे पाटबंधारे विभागाचे कर्मचारी आणि सुरक्षारक्षक यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

खडकवासला पाटबंधारे मंडळातील खडकवासला, पानशेत, वरसगाव व टेमघर या चारही धरणांवर अत्यंत कमी मनुष्यबळ आहे. मागील काही वर्षांपासून कर्मचारी सेवानिवृत्त होत असताना त्या तुलनेत नवीन भरती न झाल्याने ज्या धरणांवर अगोदर पंधरा ते वीस कर्मचारी एकावेळी उपलब्ध असायचे तेथे सध्या केवळ दोन ते तीन कर्मचाऱ्यांवर कामकाज सुरू आहे. परिणामी उपलब्ध असलेल्या कर्मचाऱ्यांना कसरत करावी लागत आहे.

वरसगाव धरणावर तर सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेऊन कामावर ठेवण्यात आले आहे. अशातच काल मध्यरात्री वरसगाव धरणाच्या थेट भिंतीवर महाकाय मगर आढळून आली. पाटबंधारे विभागातील कर्मचारी व सुरक्षारक्षक यांना ही मगर दिसल्यानंतर त्यांनी वरिष्ठांना याबाबत माहिती दिली. तातडीने वन विभागाला माहिती देण्यात आल्यानंतर औंध येथील रेस्क्यु टीमने या महाकाय मगरीला पकडून नेले.

 

मगरींचा अधिवास असल्याचे स्पष्ट!

खडकवासला, पानशेत, वरसगाव या धरणांच्या पाणलोट क्षेत्रांत मगरी दिसून येत असल्याच्या तक्रारी परिसरातील नागरिक सातत्याने करत आहेत. खडकवासला धरणाच्या मागे काही वर्षांपूर्वी मगर आढळून आली होती. तसेच खानापूर येथील पाणवठ्याजवळ मगरीचे पिल्लू आढळून आले होते. आता वरसगाव धरणाच्या भिंतीवर महाकाय मगर आढळून आल्याने धरण साखळीत मगरींचा अधिवास असल्याचे स्पष्ट झाले आहे. या भागात येणारे पर्यटक, स्थानिक नागरिक यांच्या माहितीसाठी व सुरक्षिततेसाठी वन विभागाने तातडीने आवश्यक उपाययोजना करणे आवश्यक आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

बारामती लोकसभा मतदारसंघात कोणाचं पारडं जड राहील?

  • सुप्रिया सुळे (72%, 23 Votes)
  • सुनेत्रा पवार (28%, 9 Votes)

Total Voters: 32

Loading ... Loading ...


Related Articles