♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

Electricity Shock incidents: विजेच्या धक्क्याने खडकवासला आणि मालखेड येथे दोन जणावरांचा मृत्यू; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान; सुदैवाने मनुष्यहानी नाही 

सिंहगड: मुसळधार पावसामुळे तुटून पडलेल्या विजेच्या तारांमुळे खडकवासला येथे बैलाचा तर मालखेड येथे दुभत्या म्हशीचा विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाला आहे. खडकवासला येथील घटना रविवारी(28 जुलै) तर मालखेड येथील घटना काल घडली आहे. सुदैवाने दोन्ही घटनांमध्ये प्रसंगावधान राखल्याने शेतकऱ्यांचे प्राण वाचले आहेत. दोन्ही घटनांमध्ये शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे.

खडकवासला येथील शिव रस्त्यावर डोंगर उतारालगत उघड्यावर असलेल्या विजेच्या वायरचा धक्का बसून बैलाचा जागीच मृत्यू झाला. काल मालखेड येथील शेतकरी सुनील नारायण जोरी यांच्या म्हशी शेतातून गोठ्यावर घेऊन येत असताना महावितरणच्या तुटून पडलेल्या तारेचा धक्का एका म्हशीला लागला. तारेतून विजप्रवाह सुरू असल्याने म्हशीचा जागीच मृत्यू झाला. सुदैवाने इतर म्हशी, गायी व शेतकरी या दुर्घटनेत थोडक्यात बचावले आहेत. सुनील जोरी यांची दुभती म्हैस मेल्याने एक ते सव्वा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

दरम्यान घडलेली माहिती चेतन जोरी, अनिकेत जोरी यांनी तातडीने महावितरणचे खानापूर उपकेंद्रातील अधिकारी, पशुवैद्यकीय अधिकारी व हवेली पोलीस ठाण्यात दिली. संबंधित अधिकाऱ्यांनी पाहणी केली असून लवकर नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी सुनील जोरी यांनी केली आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

Sorry, there are no polls available at the moment.

Related Articles