♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

आदिवासी कातकरी शेतमजूराची हत्या, महिलेलाही गाडीखाली चिरडून जीवे मारण्याचा प्रयत्न तरीही ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल नाही? हवेली पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह 

पुणे: शेतात काम करण्यासाठी न आल्याच्या शुल्लक कारणावरून हवेली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मांडवी बुद्रुक येथे दि. 3 जुलै रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास तात्या उर्फ भरत लक्ष्मण वाल्हेकर(वय 50) या आदिवासी कातकरी शेतमजूराची कोयत्याने वार करून व नंतर अंगावर भरधाव वेगाने कार घालून हत्या करण्यात आली होती. तसेच जखमी पतीला उचलण्यासाठी गेलेल्या अनुसया वाल्हेकर यांच्याही अंगावर कार घालून मारण्याचा प्रयत्न झाला होता. याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम 103(1), 109, 351(2)(3), 352, आर्म ॲक्ट 4,27 नुसार दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

मात्र याप्रकरणी पिडीत कुटुंब हे आदिवासी कातकरी समाजाचे आहे हे आरोपीला माहित असताना त्यांनी अत्यंत क्रूरपणे हे हत्याकांड केलेले असताना व पोलीसांनाही पिडीत कुटुंब हे आदिवासी कातकरी समाजाचे आहे हे माहित असताना या प्रकरणात ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल न करण्यात आल्याने पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

पिडीत कुटुंब आदिवासी कातकरी समाजातील असल्याने आणि शेतमजूर म्हणून काम करुन आपला उदरनिर्वाह करत असल्याने कौटुंबिक परिस्थिती अत्यंत नाजूक आहे. अशिक्षित असल्याने त्यांना कायद्याची माहिती नाही. अशा परिस्थितीत पोलीसांनी संवेदनशीलता दाखवून पिडीत कुटुंबाला योग्य न्याय मिळेल अशी भूमिका घेणे अपेक्षित होते. धक्कादायक म्हणजे आदिवासी कातकरी कुटुंबावर एवढ्या अमानुषपणे अन्याय, अत्याचार झाला हे अनुसूचित जाती जमाती अन्याय अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (ॲट्रॉसिटी) येते की नाही हे हवेली पोलीसांना माहिती नव्हते का? का हलगर्जीपणा करण्यात आला? गुन्हा दाखल करणाऱ्या अंमलदारांना कायद्याचे ज्ञान नाही का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

बारामती लोकसभा मतदारसंघात कोणाचं पारडं जड राहील?

  • सुप्रिया सुळे (72%, 23 Votes)
  • सुनेत्रा पवार (28%, 9 Votes)

Total Voters: 32

Loading ... Loading ...


Related Articles