♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

‘मी कोण आहे तुला माहित नाही, तू नोकरी कशी करतो ते बघतो’ असे म्हणत पोलीस कर्मचाऱ्याला भर रस्त्यावर मारहाण; हवेली पोलीस ठाण्याच्या हद्दीत नेमकं सुरक्षित कोण?

खडकवासला: ‘मी कोण आहे तुला माहित नाही. तू नोकरी कशी करतो तेच बघतो’ असे म्हणत हवेली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिंहगड रस्त्यावरील कोल्हेवाडी चौकात पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण व शिवीगाळ करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी मंगेश शिवाजी फडके( वय 34, सर्वे नं 3, हेवन पार्क, महंमदवाडी, हडपसर पुणे) व बापू रोहिदास दळवी ( वय 45, सर्वे नं 10, शेल पेट्रोल पंपाशेजारी, महंमदवाडी हडपसर पुणे) यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 121(1), 132, 351(2)(3), 352 नुसार हवेली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हवेली पोलीस ठाण्यात नेमणूकीस असलेले पोलीस कर्मचारी ऋषिकेश गायकवाड व आर. सी. फडतरे हे दि. 7 जुलै रोजी सिंहगड रस्त्यावरील कोल्हेवाडी चौकात रस्त्याचे काम सुरू असल्याने होत असलेली वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी नेमणूकीस होते. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास एक टाटा नेक्सॉन कार भरधाव वेगाने येत असल्याचे पाहून पोलीस कर्मचारी ऋषिकेश गायकवाड यांनी ती कार थांबवली व रस्त्याच्या बाजूला घेण्यास सांगितले. त्यावेळी चालक मंगेश फडके याने अरेरावी सुरू केली व कार बाजूला घेण्यास नकार दिला. मंगेश फडके हा कार तशीच रस्त्यावर उभी ठेऊन उतरला व ‘ मी कोण आहे तुला माहित नाही. तू नोकरी कशी करतो तेच बघतो’असे म्हणत पोलीस कर्मचारी ऋषिकेश गायकवाड यांना शिवीगाळ करत मारहाण सुरू केली. त्यावेळी दुसरे पोलीस कर्मचारी आर सी फडतरे हे गायकवाड यांच्या मदतीसाठी धावले. तेव्हा कारमध्ये बसलेला बापू रोहिदास दळवी हा कारमधून उतरला आणि तोही मारहाण करु लागला.

भर रस्त्यावर हा धक्कादायक प्रकार सुरु होता. रविवार असल्याने पर्यटकांची वर्दळ होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात बघ्यांची गर्दी जमली होती. याबाबत पोलीस कर्मचारी ऋषिकेश गायकवाड यांच्या फिर्यादीवरून मंगेश शिवाजी फडके व बापू रोहिदास दळवी या दोघांच्या विरोधात सुधारित भारतीय न्याय संहिता 2023 च्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

हवेली पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरक्षित कोण?

मागील काही दिवसांपासून हवेली पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी घटना घडल्या आहेत. कोयता गॅंगने तरुण, महिला, ज्येष्ठ नागरिक यांना जबर मारहाण केल्याची घटना नुकतीच काही दिवसांपूर्वी किरकटवाडी येथे घडली होती. पत्रकारांनाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. आता तर थेट पोलीसांनाच मारहाण झाल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तसेच अवैध धंदेवाले वगळता इतर कोणीच अगदी पोलीस सुध्दा सुरक्षित नसल्याचे चित्र सध्या हवेली पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिसत आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

बारामती लोकसभा मतदारसंघात कोणाचं पारडं जड राहील?

  • सुप्रिया सुळे (72%, 23 Votes)
  • सुनेत्रा पवार (28%, 9 Votes)

Total Voters: 32

Loading ... Loading ...


Related Articles