♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

खोटी तक्रार दाखल करणे भोवले; उत्तमनगर पोलीस ठाण्यात एकावर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल; आरपीआयचे पदाधिकारी कुणाल सरवदे यांच्या पाठपुराव्याला यश 

पुणे: जाणीवपूर्वक अडकविण्यासाठी खोटी अदखलपात्र तक्रार दाखल करुन मानसिक त्रास दिला असे म्हणत आरपीआयचे पदाधिकारी कुणाल सरवदे यांनी उत्तमनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार अर्ज दाखल केला होता. सदर तक्रार अर्जावरुन बाळासाहेब बबनराव बराटे (वय 52, मातोश्री बंगला, वनदेवी मंदिरासमोर, कर्वेनगर) यांच्यावर अनुसूचित जाती जमाती अन्याय व अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार (ॲट्रॉसिटी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बाळासाहेब बराटे यांनी उत्तमनगर पोलीस ठाण्यात कुणाल सरवदे यांच्या विरोधात अदखलपात्र तक्रार दाखल केली होती. संबंधित तक्रार पूर्णपणे खोटी असून त्यावेळी आपण आपल्या राहत्या घरी होतो व तसे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध असून आपण अनुसूचित जातीतील असल्याचे माहीत असताना जाणीवपूर्वक बराटे यांनी खोटी तक्रार दाखल करुन मानसिक त्रास देत बदनामी केली असा तक्रार अर्ज सरवदे यांनी उत्तमनगर पोलीस ठाण्यात दिला होता.

संबंधित कर्जाबाबत कुणाल सरवदे हे सातत्याने उत्तमनगर पोलीस स्टेशन व वरिष्ठांकडे पाठपुरावा करुन कारवाई करण्याची मागणी करत होते. अखेर आज बाळासाहेब बराटे यांच्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सहाय्यक पोलीस आयुक्त रंगनाथ उंडे अधिक तपास करत आहेत.

 

कायद्याची भिती असायला हवी 

जाणीवपूर्वक खोट्या तक्रारी दाखल करुन निरपराध लोकांना अडकविण्याचा धंदा थांबायला हवा आणि असे केले तर काय होते याची भिती संबंधितांना वाटायला हवी म्हणून आपण या अन्यायाविरुद्ध सातत्याने आवाज उठविला. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी आपली बाजू ऐकून घेतली. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाचा हा विजय आहे. खोट्या तक्रारी दाखल करणाऱ्यांना यामुळे जरब बसेल अशी भावना कुणाल सरवदे यांनी व्यक्त केली.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

बारामती लोकसभा मतदारसंघात कोणाचं पारडं जड राहील?

  • सुप्रिया सुळे (72%, 23 Votes)
  • सुनेत्रा पवार (28%, 9 Votes)

Total Voters: 32

Loading ... Loading ...


Related Articles