♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

Sinhagad road accident: मद्यधुंद कारचालकाचे नियंत्रण सुटून सिंहगड रस्त्यावरील एनडब्ल्युए गेट जवळ भीषण अपघात; दुभाजक तोडून कार आली थेट विरूद्ध दिशेला

पुणे: सिंहगड रस्त्यावरील नांदेड फाटा ते किरकटवाडी फाटा या दरम्यान असलेल्या एनडब्ल्युए (राष्ट्रीय जल अकादमी) गेट जवळ मद्यधुंद कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात झाला आहे. दुभाजक तोडून कार थेट विरुद्ध दिशेला येऊन आदळली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नसून खडकवासला बाजूकडे जात असलेले दुचाकीवरील काही नागरिक थोडक्यात बचावले आहेत. कारचा वेग खूप जास्त असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे.

नऊ ते सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास खडकवासला बाजूकडून मद्यधुंद तरुण कारने पुण्याच्या दिशेने जात होते. एनडब्ल्युए गेट जवळ चालकाचे नियंत्रण सुटले व कार दुभाजकावर आदळून थेट विरुद्ध बाजूला गेली. त्याच वेळी दुसऱ्या बाजूने जात असलेले दुचाकीवरील काही नागरिक थोडक्यात बचावले. दुचाकीवरील एकाच्या पायाला किरकोळ दुखापत झाली आहे.
अपघातात जीवितहानी झालेली नसून कारचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघातानंतर कारमधील तरुणांना नीट उभेही राहता येत नव्हते. धुलवड असल्याने सकाळी काही वेळ हवेली पोलीसांनी खडकवासला धरण चौकात नाकाबंदी करुन ‘दाखवण्यापुरती’ वाहनतपासणी केली मात्र नाकाबंदीची खरी गरज सायंकाळी होती. मद्यधुंद कारचालक, दुचाकीस्वार यांना खडकवासला धरण चौकात अडवून योग्य कारवाई केली असती तर अपघात टाळता आला असता.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

बारामती लोकसभा मतदारसंघात कोणाचं पारडं जड राहील?

  • सुप्रिया सुळे (72%, 23 Votes)
  • सुनेत्रा पवार (28%, 9 Votes)

Total Voters: 32

Loading ... Loading ...


Related Articles