
Video: हातात मद्याच्या बाटल्या घेऊन खडकवासला धरणात तरुणांची मस्ती;याठिकाणी अनेकांचा बुडून मृत्यू
पुणे: पुणे-पानशेत रस्त्यावरील सोनापूर गावच्या हद्दीत खडकवासला धरणाच्या पाण्यात ज्या ठिकाणी यापूर्वी अनेकांचा बुडून मृत्यू झाला आहे त्याठिकाणी आज मद्यधुंद तरुण हातात मद्याच्या बाटल्या घेऊन मस्ती करताना दिसत होते. अनेक वेळा दुर्घटना घडलेल्या असताना प्रशासनाने अद्याप या ठिकाणी कोणत्याही उपाययोजना केलेल्या नाहीत.