Video:कॉंक्रीट ऐवजी माती भरुन रिटेनींग वॉल चे काम;एनडीए-बहुली रस्त्यावर ठेकेदाराचा कारनामा
पुणे:एनडीए-बहुली रस्त्यावरील कुडजे गावच्या हद्दीत प्रथमेश हॉटेल च्या समोर पुलाचे काम निकृष्ट पद्धतीने सुरू असल्याचा प्रकार सजग नागरिकांनी उघडकीस आणला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे ठेकेदार अशाप्रकारे शासकीय निधीचा अपव्यय करत असल्याने सदर कामाची तातडीने चौकशी करून ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.